सनातन धर्माच्या नावाखालील राजकारण, हिंसेला विरोध; धर्मसंसदेचा जाहीरनामा प्रसिद्ध, नेमकं काय आहे जाहीरनाम्यात?

Dharma Sansad Kolhapur : रुईकर कॉलनी परिसरातील एका हॉटेलमध्ये धर्मसंसदेचे आयोजन करण्यात आले होते.
Dharma Sansad Kolhapur
Dharma Sansad Kolhapuresakal
Updated on
Summary

सर्वांच्या संमतीने एक जाहीरनामा प्रसिद्ध करून त्यावर स्वाक्षरी करण्यात आली. धर्माच्या आधारावर होणारी हिंसा आणि राजकारण नाकारून त्या मार्गावर जाण्याबाबत तपशीलवार चर्चा यावेळी करण्यात आली.

कोल्हापूर : धर्माच्या राजकारणीकरणाला आणि धर्माच्या नावाखाली होणाऱ्या हिंसेला विरोध करण्याचा निर्धार आज देशभरातील साधू, संत, महंत यांनी धर्मसंसदेत (Dharam Sansad) केला. दरम्यान, सनातन धर्माचा जागतिक स्तरावर सहिष्णुतेने गौरव करणे, भारतीय सामाजिक जडणघडण तोडणाऱ्या तथाकथित धर्मगुरूंवर जाहीर बहिष्कार टाकणे, यासह विविध महत्त्वपूर्ण ठरावही यावेळी करण्यात आले.

रुईकर कॉलनी परिसरातील एका हॉटेलमध्ये धर्मसंसदेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महंत राम दास (दिगंबरा आखाडा), महंत आनंददास नागा (निर्वाणी आखाडा), स्वामी सुंदर गिरी (जुना आखाडा), स्वामी कौशल गिरी (निरांजनी आखाडा), शिवाचार्य शिव योगी महाराज, स्वामी सांगन बसव, कोर्नेश्वर महास्वामीजी, दादा महाराज वारकरी, आशिष महाराज वारकरी, चंद्रशेखर शिवाचार्य, महंत कैलास भारती, धर्मकीर्ती महाराज वारकरी, दत्ता ढोणे महाराज, श्री परमात्मा महाराज, आशिष महाराज, गणेश महाराज, साध्वी शोभा सुपूरकर महाराज आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Dharma Sansad Kolhapur
'राज्य चुकीच्या माणसांच्या हातात, महाराष्ट्राला योग्य दिशा दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही'; शरद पवारांचा इशारा

धर्मसंसदेत देशभरातील व महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रे, प्रादेशिक मठ, पंथ यामधील सुमारे १०० प्रमुख सहभागी झाले होते. त्याचबरोबर वारकरी, दशनामी आखाड्यांचे प्रतिनिधी, वैष्णव आखाड्यांचे प्रतिनिधी आणि दत्त संप्रदायाचे संत आणि गुरूही उपस्थित होते. यावेळी विविध महत्त्वपूर्ण ठरावही करण्यात आले. यावेळी आखाडा, पंथ व संप्रदायांच्या प्रमुखांनी हिंदू धर्मातील विविध गुण आणि विविधतेबद्दल माहिती दिली. त्याचबरोबर त्यांनी सध्या धर्माच्या नावाखाली होत असलेल्या हिंसाचार आणि राजकारणावर कडक शब्दांत टीका केली.

सर्वांच्या संमतीने एक जाहीरनामा प्रसिद्ध करून त्यावर स्वाक्षरी करण्यात आली. धर्माच्या आधारावर होणारी हिंसा आणि राजकारण नाकारून त्या मार्गावर जाण्याबाबत तपशीलवार चर्चा यावेळी करण्यात आली. यासोबतच आपण स्वतः असे काहीही करणार नाही, तसेच आपल्या आजूबाजूला अशा घटना घडताना त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या धार्मिक व राजकीय नेत्यांवर बहिष्कार टाकावा, अशी शपथही उपस्थितांनी घेतली.

Dharma Sansad Kolhapur
भारताच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारा ठेवा! किकलीच्या पुरातन मंदिरात सापडले प्राचीन पटखेळांचे अवशेष

धर्मसंसदेचा जाहीरनामा

  • ‘वसुधैव कुटुंबकम्‌’ या परंपरेनुसार सनातन धर्माचा जागतिक स्तरावर सहिष्णुतेने गौरव करणे.

  • सत्य सनातन धर्माला संकुचित पक्षीय राजकारणापासून दूर ठेवणे.

  • निसर्गाकडून प्रेरणा घेऊन भेदभावमुक्त समाज घडविणे.

  • हिंसा व द्वेष नाकारून अहिंसेवर आधारित सत्य सनातनची स्थापना करणे.

  • सनातनसह इतर धर्मातील महापुरुषांप्रती आदर दर्शविणे.

  • हिंदू धर्मातून जातिवाद नष्ट करून समाजाला आदर्श स्थितीत आणणे.

  • सर्व पंथांचे भले करणे.

  • पुराणमतवाद दूर करून समानतेवर आधारित शांततामय समाजाच्या स्थापनेसाठी योगदान देणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.