वाकुर्डे योजनेचे श्रेय जयंतरावांचेच; नाईकांनी लाटण्याचा प्रयत्न करू नये

jayant patil. shivajirao naik
jayant patil. shivajirao naiksakal
Updated on

शिराळा (कोल्हापूर) : जलसंपदामंत्री जयंतराव पाटील (Jayant Patil)यांच्या माध्यमातून २०२४ पर्यंत वाकुर्डे उपसा जलसिंचन योजनेचे काम पूर्ण करण्याचे नियोजन केल्याने आता विरोधकांचे वाकुर्डे योजनेचे तुणतुणे वाजणे बंद होईल. या योजनेचे खरे श्रेय जयंतराव पाटील यांचे असल्याने ते कोणी लाटण्याचा प्रयत्न करू नये असा टोला आमदार मानसिंगराव नाईक (Mansingrao Naik)यांनी माजी आमदार शिवाजीराव नाईक (Shivajirao Naik) यांचे नाव न घेता लावला.

शिराळा येथे नागमनी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी नाईक म्हणाले, मी २००९ ला आमदार असताना या योजनेला तत्कालीन मंत्री अजितदादा पवार यांनी १६५ कोटींचा निधी दिला. त्यावेळी अंशतः वाकुर्डे योजना कार्यन्वित झाली. त्यानंतर युती शासनाने पाच वर्षात फक्त ६० कोटींचा तुटपुंजा निधी दिला. १०१९ ला महाविकास आघाडी सरकार आले. जयंतराव पाटील जलसंपदामंत्री झाल्याने त्यांनी वाकुर्डे योजनेची पाहणी केली.अधिकाऱ्यांनी मागणी केल्या प्रमाणे दोन वर्षात वाकुर्डेसाठी २०० व वारणा डावा कालव्यासाठी २०० कोटी असा शिराळा तालुक्याला ४०० कोटींचा निधी दिला. त्यामुळे युती शासनाच्या काळात या रेंगाळलेल्या योजनेला गती मिळाली आहे. आता या योजनेला ९०८.४४ कोटींची सुधारित मान्यता मिळाल्याने या योजनेच्या कामांना आणखी गती मिळेल.

jayant patil. shivajirao naik
12 कोटीची दंड वसुली कधी? मनसे जाणार हरीत लवादाकडे; उपरकरांचा इशारा

शिराळा तालुक्यातील मेणी, शिरशी व इतर प्रस्तावित कामांच्या निविदा डिसेंबर अखेर निघून ही कामे सुरू होती. या योजनेला सुधारित मान्यता मिळाल्याने नाबार्डचे अर्थसहाय्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शिराळा तालुक्यातील सर्व कामांचे टेंडर निघाल्यानंतर वाळवे तालुक्यातील कामांचे टेंडर निघतील. नाहीतर शिराळच्या ऐवजी वाळव्याच्या कामांची टेंडर निघणार अशी कोणीतरी अफवा पसरवून लोकांच्यात संभ्रम निर्माण करेल. ही योजना जयंतराव पाटील यांच्यामुळेच पूर्णत्वास जाणार असल्याने या योजनेसाठी त्यांचेच श्रेय आहे.यावेळी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक, कार्यकारी अभियंता डी.डी.शिंदे, सहाय्यक अभियंता डी. डी. परळे, शाखा अभियंता व्ही. एम. पाटील, विश्वासचे माजी संचालक भीमराव पाटील उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.