Food Expiry Date : खाद्यपदार्थ पॅकिंगवरील उत्पादित, ‘एक्सपायरी’ डेट गायब

Kolhapur Latest news in marathi | जाब विचारायला नागरिकांना नाही वेळ ः पोट, घश्याचे विकारही आले विकत घरी
manufactured and expiry date on packaging is missing stomach and throat disorders health issue
manufactured and expiry date on packaging is missing stomach and throat disorders health issueSakal
Updated on

कोल्हापूर : रेशनला येणारे अन्न-धान्यही दर्जाहीन वितरण केले जात असल्याच्या तक्रारी येतात; पण किराणा दुकानातून घेणारे धान्य, पिठे, मार्केटमधील अन्नधान्य, ब्रेड टोस्टसारखी  बेकरी उत्पादने,  वेफर्ससारखे स्नॅक्स आणि लोणची, पापडासह  भाज्यांची पॅकिंग व उत्पादित किंवा एक्सपायरी तारीख आपण न तपासता घेतो. खरे तर अशी पॅकिंग फक्त नावालाच केलेली असतात. त्यामुळे आपण खातो  त्या अन्नाचे ‘शेल्फ लाईफ’ तपासण्याची गरज आहे. 

- मोहन मेस्त्री

बहुतेक सुपरमार्केट धान्य डाळीमधून कचरा कमी करण्याचे काम करतात. जवळजवळ सर्व विभागांमध्ये नाशवंत वस्तू विक्रीसाठी असतात. फळे आणि भाज्या स्पष्ट कालबाह्य तारखांसह येत नाहीत, तर काही उत्पादन या तारखेनुसार विकले जाऊ शकत नाहीत.

कारण ते स्टोअरच्या आसपास खरेदी केले जातात. पाव, बटर, केक अशी विविध बेकरी उत्पादने करण्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा मालचा दर्जाही तपासलेला नसतो. मैदा कोणत्या गव्हापासून बनविला आहे. उत्पादन पॅक करणारा कामगार वर्ग बिडी, सिगारेट, मावा, गुटखा असे विविध पदार्थ सेवन करणारे आहेत का, याचीही तपासणी होत नाही.

पायाने पीठ तुडवल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरून पाहतो. प्रशासनाने तपासणी केल्याची आपण खात्री देऊ शकत नाही. एकंदरीत अनेक पदार्थांची पॅकिंग शासकीय नियमानुसार नसतात. असे खाद्य पदार्थ अगदी दहा-वीस रुपयांपासून अर्धा पाव किलोपर्यंत पॅकिंग दुकानात तयार असतात. सर्वच पाकिटावर उत्पादनाबाबत माहिती  नसते, अनेक खाद्यपदार्थ कोणत्या बेकरीत किंवा कंपनीत केलेले आहेत, हेही समजत नाही.  

अलीकडे, गोठवलेल्या मांसाची चाचणी घेत आहेत, ते स्टोअरमध्ये येईपर्यंत ट्रेसिबिलिटीला खूप महत्त्व असते.  शेतकऱ्याकडून दूध खरेदी करून त्यापासून पणीर, खवा, आम्रखंड ,श्रीखंड, बासुंदी, पेढे, मिठाई केली जाते. याची विक्री खुल्या पद्धतीने किंवा पॅकिंगमध्ये केली जाते, तरीही त्याची उत्पादित अन्‌ ‘एक्सपायरी’ माहीत नसते. आपण दुकानदारावर विश्वास ठेवून हे खरेदी करतो. अनेकदा भेसळयुक्त खाद्यपदार्थसोबत पोटाचे विविध विकार, घसा विकारही विकत घरी आणतो.

‘शेल्फ लाइफ’ म्हणजे काय?

एखाद्या पदार्थाचं ‘शेल्फ लाइफ’ किती आहे, यावरून त्या पदार्थाची ‘एक्सपायरी डेट’ ठरते. ‘शेल्फ लाइफ’ म्हणजे जो कालावधी त्या दरम्यान अन्न खाण्यासाठी सुरक्षित असते, त्याची चव, स्वरूप आणि नरमपणा, कडकपणा अशा  मूळ तयार केल्या गेलेल्या अवस्थेत असतो तसाच राहतो. या कालावधीत खाद्यपदार्थांच्या पाकिटावर जी पोषण संबंधित माहिती दिलेली असते ते दावे, निकष हे सर्व योग्य असतील तर ते अन्न त्या कालावधीत योग्य गुणवत्तेचं म्हणता येईल .

अशी काढतात एक्सपायरी डेट

प्रत्येक अन्न उत्पादक त्या पदार्थाचा कालावधी निश्चित करण्यासाठी पदार्थाचा (शेल्फ लाईफ) अभ्यास  करतात. अन्नाचे शेल्फ लाइफ निश्चित करण्यासाठी अपेक्षित शेल्फ लाइफपेक्षा जास्त कालावधीसाठी निश्चित  केलेल्या परिस्थितीत उत्पादन साठवून ठेवतात, आणि उत्पादन कधी खराब होऊ लागते, हे पाहण्यासाठी ते नियमित अंतराने तपासतात. यात रासायनिक गतिशास्त्राचे नियम आणि त्यावर आधारित गणितवरून अन्न किती दिवसांत खराब होईल / खराब व्हायला सुरुवात होईल हे काढले जाते.

‘शेल्फ लाइफ’ यावर अवलंबून

  • घटकांचे प्रकार : कच्चा माल, इतर रासायनिक घटक,  त्यांचं प्रमाण

  • उत्पादन प्रक्रिया

  • पॅकेजिंगचा प्रकार

  • साठवण्याची परिस्थिती

  • कालावधी असा मोजतात

उत्पादनाची तारीख आणि पॅकिंग तारीख

  • लवकर खराब होणारे पदार्थ ः एक्सपायरी डेट या तारखेपर्यंत..

  • ब्रेड  आणि बेकरी पदार्थांची ः ‘या तारखेपूर्वी योग्य’.

  • स्टोरेजविषयी लेबलवर विशिष्ट सूचना समाविष्ट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.