Maratha Community : छगन भुजबळांविरुद्ध मराठा समाज आक्रमक; चांदीच्या चमच्याने भुजबळांच्या प्रतिमेला भरविले शेण

गेल्या ५० दिवसांपेक्षा जास्त काळ दसरा चौकामध्ये मराठा आरक्षणासाठी धरणे आंदोलन सुरू आहे.
Kolhapur Chhagan Bhujbal Maratha Community
Kolhapur Chhagan Bhujbal Maratha Communityesakal
Updated on
Summary

कोल्हापुरात सकल मराठा समाजातर्फे भुजबळ यांच्या विरोधात ‘गोबर आंदोलन’ करण्यात आले. 

कोल्हापूर : भिवंडी-ठाणे येथील ओबीसी मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी ‘ओबीसी विरोधात बोलणाऱ्यांचा निवडणुकीत कार्यक्रम करावा,’ असे विधान केले. त्यामुळे मराठा समाजात पुन्हा तीव्र असंतोष पसरून त्याचे येथे पडसाद उमटले. सकल मराठा समाजातर्फे भुजबळ यांच्या विरोधात ‘गोबर आंदोलन’ करण्यात आले. 

गेल्या ५० दिवसांपेक्षा जास्त काळ दसरा चौकामध्ये मराठा आरक्षणासाठी धरणे आंदोलन सुरू आहे. आंदोलनस्थळी मराठा समाजाच्या विरोधात बोलणाऱ्या छगन भुजबळ यांच्या प्रतिमेला महिला कार्यकर्त्या व रिक्षा संघटनेच्या सदस्यांनी तसेच महाराष्ट्र गव्हर्न्मेंट नर्सिंग असोसिएशनच्या सदस्यांनी चांदीच्या चमच्याने शेण भरवण्याचे प्रतीकात्मक आंदोलन केले.

Kolhapur Chhagan Bhujbal Maratha Community
Maratha Reservation : साताऱ्यात आतापर्यंत आढळल्या तब्बल सव्वा लाख कुणबी नोंदी; पाटण, जावळी तालुक्यात सर्वाधिक नोंदी

कार्यकर्त्यांनी ‘हा आवाज मराठ्यांचा’, ‘मराठाद्वेषी छगन भुजबळचं करायचं काय....?’ अशी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी विविध सामाजिक संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. महाराष्ट्र गव्हर्न्मेंट नर्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष हषमत हवेरी, संदीप नलवडे, मनोज चव्हाण, राजर्षी शेळके, तीन आसनी प्रवासी रिक्षा संघटनेचे अविनाश दिंडे, श्रीकांत पाटील, उदय इनामदार, जाफर मुजावर, संभाजी रणदिवे, संतोष पैठणकर, नीलेश रणभिसे, नीलेश भोसले, अशोक देंगे, सुरेश धनवडे, सुनील थोरात, गणेश तुपवाडकर, प्रकाश पाटील, जाफर वस्ताद, अनसार बागवान, जाकीब मुजावर, अशोक जांभळे, संभाजी सुतार, संजय जाधव, नवनाथ चव्हाण, चंदू ओतारी उपस्थित होते.

Kolhapur Chhagan Bhujbal Maratha Community
OBC समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या; उदयनराजेंचं PM मोदींना साकडं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.