मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन; पुण्यात उपचारासाठी नेताना वाटेतच घेतला अखेरचा श्‍वास

रविवारी (ता. २१) सकाळी मुक्त सैनिक वसाहतीतील निवासस्थानातून अंत्ययात्रा निघणार आहे.
Maratha Kranti Morcha coordinator Dilip Patil passed away
Maratha Kranti Morcha coordinator Dilip Patil passed awayesakal
Updated on
Summary

मराठा क्रांती मोर्चाच्यात त्यांनी राज्य समन्वयक म्हणून मोठी कामगिरी पार पाडली. मोर्चानंतर त्यांनी ई.डब्ल्यू.एस. संदर्भात न्यायालयीन लढाईतही सहभाग घेतला.

कोल्हापूर : क्षत्रिय मराठा चेंबर्सचे संस्थापक, मराठा क्रांती मोर्चाचे (Maratha Kranti Morcha) समन्वयक व उद्योजक दिलीप मधुकरराव पाटील (वय ६२) यांचे शनिवारी (ता. २०) सायंकाळी पुणे (Pune) येथे उपचारासाठी नेताना वाटेतच कराडजवळ निधन झाले. त्यांच्या निधनाने सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, दोन भाऊ असा परिवार आहे. रविवारी (ता. २१) सकाळी मुक्त सैनिक वसाहतीतील निवासस्थानातून अंत्ययात्रा निघणार आहे. पाटील यांचे मूळगाव डफळापूर (ता. जत, जि. सांगली) हे असून त्यांचे वडील मधुकरराव हे व्यवसायानिमित्त कोल्हापुरात आले. दिलीप पाटील यांचे शालेय शिक्षण विद्यापीठ हायस्कूल, तर महाविद्यालयीन शिक्षण गोपालकृष्ण गोखले महाविद्यालयातून झाले.

Maratha Kranti Morcha coordinator Dilip Patil passed away
उद्या गडावर जाऊन, कोणीही फाईव्हस्टार हॉटेल बांधेल; विशाळगडावरुन उदयनराजेंचा अतिक्रमणधारकांना स्पष्ट इशारा

महाविद्यालयीन जीवनात त्यांनी उत्तम क्रिकेटपटू म्हणून काळ गाजविला. एक उद्योजक म्हणून त्यांचा अनेक संस्थांशी संर्पक आला. मराठा क्रांती मोर्चाच्यामध्येही त्यांनी राज्य समन्वयक म्हणून मोठी कामगिरी पार पाडली. मोर्चानंतर त्यांनी ई.डब्ल्यू.एस. संदर्भात न्यायालयीन लढाईतही सहभाग घेतला. याशिवाय मराठा आरक्षण संदर्भातील न्यायालयीन लढाईत ते प्रमुख याचिकाकर्तेही आहेत.

Maratha Kranti Morcha coordinator Dilip Patil passed away
विशाळगड दंगलीनंतर भेदरलेल्या कोवळ्या मुलांची शाळाही दुरावली; दंगल होऊन चार दिवस उलटले, तरी मुलं भीतीच्या छायेखाली

अनेक सामाजिक संस्थांशी त्यांची जवळीक होती. काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारानंतर ते शुक्रवारी (ता. १९) कोल्हापुरात आले असता त्यांना पुन्हा त्रास सुरू झाला. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना येथेच खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पुढील उपचारासाठी काल त्यांना पुन्हा पुण्याला हलविले. दरम्यान, कराडजवळ वाटेतच त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.