मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या भुजबळांच्या पुतळ्याचं कोल्हापुरात दहन; आंदोलनाला आर्य क्षत्रिय समाजाचा पाठिंबा

भुजबळ यांनी मराठा आरक्षणाला विरोध केल्याने सर्वत्र तीव्र पडसाद उमटले आहेत.
Maratha Reservation Andolan Chhagan Bhujbal
Maratha Reservation Andolan Chhagan Bhujbalesakal
Updated on
Summary

मनोज जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ दसरा चौकात सकल मराठा समाजातर्फे साखळी धरणे आंदोलन सुरू केले आहे.

कोल्हापूर : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आणि मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल अवमानकारक विधान केल्याच्या कारणातून काल (बुधवार) सकल मराठा समाजाने अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. या वेळी भुजबळांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

यावेळी कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात झटापट झाली. भुजबळ यांनी मराठा आरक्षणाला विरोध केल्याने सर्वत्र तीव्र पडसाद उमटले आहेत. कोल्हापुरातील सकल मराठा समाजातर्फेही भुजबळ यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त होता. दुपारी साडेबाराच्या सुमारास आंदोलक दसरा चौकात एकवटले.

Maratha Reservation Andolan Chhagan Bhujbal
Kolhapur : महाडिक कुटुंबातील 'ही' व्यक्ती लोकसभा लढवणार? समरजित घाटगेंचंही नाव आघाडीवर; मुश्रीफांची भूमिका ठरणार निर्णायक

आंदोलकांनी मंत्री भुजबळ यांच्या निषेधाच्या घोषणा देत पुतळ्याला चप्पल मारो केले. आंदोलनात वसंतराव मुळीक, बाबा पार्टे, दिलीप देसाई, विजय देवणे, संजय पवार, शाहीर दिलीप सावंत, सुभाष जाधव, सुरेश कुराडे, संपतराव चव्हाण-पाटील, अवधूत पाटील, संजय काटकर, चंद्रकांत भोसले, शारंगधर देशमुख, सचिन पाटील, शिवराज गायकवाड, सुनीता पाटील, गीता हसूरकर, शैलजा भोसले, संयोगिता देसाई, उदय लाड, प्रसन्न शिंदे, विनय कदम, श्रीकांत मनोळे, फिरोजखान वस्ताद, शंकरराव शेळके, प्रकाश पाटील, अभिजित खतकर, दिग्विजय मगदूम, मयूर पाटील, संजय पटकारे आदी सहभागी झाले होते.

Maratha Reservation Andolan Chhagan Bhujbal
BJP Politics : भाजपनं 'या' पक्षासोबत केली युती; नाराज झालेल्या माजी केंद्रीय मंत्र्यानं राजकारणातून घेतली तडकाफडकी निवृत्ती

‘आर्य क्षत्रिय’ समाजाचा आंदोलनाला पाठिंबा

मनोज जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ दसरा चौकात सकल मराठा समाजातर्फे साखळी धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला बुधवारी आर्य क्षत्रिय समाजाच्या शिष्टमंडळाने भेट देऊन पाठिंबा दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.