Maratha Reservation : मराठा समाजाला घाबरूनच राज्यपालांचा 'तो' दौरा अचानक रद्द? नेमकं काय आहे प्रकरण

सकल मराठा समाजाच्या (Maratha Reservation) असंतोषाला घाबरूनच राज्यपालांचा कोल्हापूर दौरा रद्द केला.
Maratha Reservation Case Governor Ramesh Bais
Maratha Reservation Case Governor Ramesh Baisesakal
Updated on
Summary

शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभासाठी राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांचा दौरा निश्चित झाला होता.

कोल्हापूर : सकल मराठा समाजाच्या (Maratha Reservation) असंतोषाला घाबरूनच राज्यपालांचा कोल्हापूर दौरा रद्द केला, अशी टीका दसरा चौकात धरणे आंदोलन करणाऱ्या सकल मराठा कार्यकर्त्यांनी केली. यावेळी ‘मराठ्यांना शासन घाबरले’ अशा आशयाचे फलक हातात घेऊन राज्यशासनाच्या विरोधातील घोषणांनी दसरा चौक दणाणून सोडला.

आंदोलनास आजही विविध संस्था आणि संघटनांनी जाहीर पाठिंबा व्यक्त केला. शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभासाठी राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांचा दौरा निश्चित झाला होता. यावेळी मराठा समाजाविरोधात बोलणारे मंत्री छगन भुजबळ यांच्यावर राज्यपालांनी कारवाई करण्याची मागणी केली होती आणि याप्रश्नी मराठा समाजासोबत बैठक न घेतल्यास राज्यपालांना काळी निशाणे दाखवण्याची भूमिका घेतली होती.

Maratha Reservation Case Governor Ramesh Bais
Maratha Reservation : आरक्षणासाठी दुबईतही मराठ्यांचा एल्गार; मनोज जरांगे-पाटील साधणार Online संवाद

त्यामुळे शासनाने राज्यपाल यांच्या दौऱ्यावेळी त्यांच्यासोबत बैठक निश्चित केली होती, परंतु रविवारी भुजबळ यांनी ठाणे येथे ओबीसींच्या मेळाव्यात पुन्हा मराठा समाजविरोधात आक्रमक विधान केले. यामुळे मराठा समाजामध्ये पुन्हा असंतोष पसरला. परिणामतः राज्यपाल यांच्या दौऱ्यावेळी काही अनूचित प्रकार घडू नये, या भीतीने राज्य शासनाने राज्यपालांचा दौरा रद्द केला. याचाच अर्थ मराठा समाज घाबरून शासनाने हा निर्णय घेतला, अशी टीका सकल मराठा समाजाचे नेत्यांनी केली.

दसरा चौकातील धरणे आंदोलनस्थळी सरनोबतवाडी ग्रामस्थ, वकील संघटना व मूक-कर्णबधिर असोसिएशनच्या सदस्यांनी पाठिंबा व्यक्त केला. सरनोबतवाडी सरपंच शुभांगी किरण आडसूळ, वैशाली माळी, योगीता आडसूळ, योगीराज आडसूळ, किरण आडसूळ, के. डी. माने, बाळकृष्ण खोत, अक्षय कोडे, संग्राम गजबर, प्रमोद कांबळे, संतोष शिंदे, आनंद गजबर, प्रकाश आडसूळ, युवराज माने, नामदेव गोरे, अमर कांबळे, महादेव कांबळे, नेहा आडसूळ, महेश्वरी गुरव, सरिता कांबळे, अनुसया कांबळे.

Maratha Reservation Case Governor Ramesh Bais
Maratha Reservation : मनोज जरांगे-पाटलांच्या 'त्या' भूमिकेला आमचा पाठिंबा; काय म्हणाले काँग्रेस नेते सतेज पाटील?

तसेच सतीश लाड, धर्मराज गणपाटील, पांडुरंग पाटील, भालचंद्र धोंगडे, पांडुरंग माने, दिलीप पोवार, सिध्देश चौगुले, अनिल गजबर, ऋषिकेश गुरव उपस्थित होते. वकील संघटनेच्या ॲड. हेमा काटकर, अश्विनी भोसले, कल्पना पाटील, कल्पना माने, संपदा माने, अपर्णा कदम, ओंकार पाटील, अनिसा शेख यांनी पाठिंबा व्यक्त केला. मूक-कर्णबधिर असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष उद्धव पन्हाळकर, अभय गवळी, गौरव शेलार, विनोद चव्हाण, संजय चव्हाण, किरण सूर्यवंशी, योगेश जाधव, जयश्री गवळी, अमेय गायकवाड, आर्या फळसळकर, अतुल फणसळकर उपस्थित होते.

राज्यपाल रमेश बैस यांचा दौरा ऐनवेळी झाला रद्द

शिवाजी विद्यापीठाच्या दिक्षान्‍त समारंभासह अन्य कार्यक्रमासाठी येथे येणाऱ्या राज्यपाल रमेश बैस यांचा दौरा आज अचानक रद्द झाला. आज राज्यपाल श्री. बैस हे कोल्हापुरात येणार असल्यामुळे रात्रीपासून प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. बंदोबस्तासाठी पोलिसांना कामावर हजर राहण्यास सांगितले होते. शिवाजी विद्यापीठाचा दिक्षान्‍त समारंभ, कंदलगावमधील विकसित भारत संकल्प यात्रा, कसबा बावड्यातील स्वयंम्‌ शाळेतील हॉलचे उद्‌घाटन आदी कार्यक्रमांचे नियोजन केले होते.

मात्र राज्यपाल श्री. बैस यांचा दौरा रद्द झाल्याने स्वयम्‌ शाळेतील हॉलचे उद्‌घाटन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते करावे लागले. याशिवाय, कंदलगावमधील विकसित भारत संकल्प यात्रेचीही तयारी मोठ्या प्रमाणात केली होती. तसेच जिथे कार्यक्रम होणार होते, त्या ठिकाणच्या रस्त्यांवरील खड्ड्यांचे पॅचअप महापालिकेने केले होते. जे खड्डे वर्षानुवर्षे तसेच राहिले होते, ते राज्यपाल येणार म्हणून बुजवून घेतले होते.

Maratha Reservation Case Governor Ramesh Bais
Assembly Elections : '..तोपर्यंत मी निवडणूक लढणार नाही, हा माझा शब्दच आहे'; BJP आमदाराची मोठी घोषणा

कसबा बावडा न्यायालयाच्या बाजूला असलेल्या स्वयंम शाळेच्या हॉलचे उद्‌घाटन करण्यासाठी राज्यपाल येणार होते, तो रस्ताही काही ठिकाणी खडी टाकून व्यवस्थित केला होता. हा रस्ता अतिशय खराब होता. खडी उखडून बाजूला पडली होती. राज्यापालांच्या दौऱ्याने काही रस्त्यावरील खड्डे मात्र बुजवले गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.