Maratha Reservation : 'जे कुणबी असतील त्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावेच लागेल'; काय म्हणाले मुश्रीफ?

माजी न्यायमूर्ती शिंदे समिती रद्द करावी, अशी मागणी भुजबळ यांनी केली आहे.
Minister Hasan Mushrif
Minister Hasan Mushrifesakal
Updated on
Summary

भुजबळ यांनी पहिल्यापासूनच मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. जे कुणबी दाखले देत आहेत, त्याबद्दल त्यांचे मत वेगळे आहे.

कोल्हापूर : ‘कुणबी नोंदी (Kunbi Community) सापडत असतील, तर ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) लाभ मिळणारच, मंत्री छगन भुजबळ यांना काही मत व्यक्त करायचे असेल, तर त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली पाहिजे’, असे मत पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी व्यक्त केले.

Minister Hasan Mushrif
Milk Price Maharashtra : राज्यात 30 टक्के दुधात भेसळ; खुद्द दुग्धविकासमंत्र्यांनीच दिली खळबळजनक माहिती

माजी न्यायमूर्ती शिंदे समिती रद्द करावी, अशी मागणी श्री. भुजबळ यांनी केली आहे. याबाबत मुश्रीफ यांना बिद्री साखर कारखान्याच्या प्रचारादरम्यान निढोरी (ता. कागल) येथे विचारलेल्या प्रश्‍नावर ते बोलत होते.

पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘कुणबी दाखले योग्य असतील, तर त्यांना ओबीसी दाखले द्यावेच लागतील, यात कोणतीही शंका नाही. भुजबळ यांनी समिती रद्दबाबत मंत्रिमंडळात चर्चा केली पाहिजे.

Minister Hasan Mushrif
Maratha Reservation : भुजबळांनी मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन बाहेर पडावं, अन्यथा..; काय म्हणाले मंत्री विखे-पाटील?

दरम्यान, भुजबळ यांनी पहिल्यापासूनच मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. जे कुणबी दाखले देत आहेत, त्याबद्दल त्यांचे मत वेगळे आहे. मात्र, कुणबी दाखले योग्य असतील, तर त्यांना ओबीसी दाखले द्यावेच लागतील, असेही मुश्रीफ यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.