Maratha Reservation : सरकारने दिलेली मुदत संपेपर्यंत उपोषण स्थगित करा - माजी आमदार सत्यजित पाटील

घटस्थापनेच्या मुहूर्तावर पन्हाळा तहसीलदार कार्यालयासमोर जाफळे येथील दोघांनी मराठा आरक्षण मिळण्यासाठी आमरण उपोषण चालू केले आहे.
Former MLA Satyajeet Patil
Former MLA Satyajeet Patilsakal
Updated on

पन्हाळा - घटस्थापनेच्या मुहूर्तावर पन्हाळा तहसीलदार कार्यालयासमोर जाफळे येथील दोघांनी मराठा आरक्षण मिळण्यासाठी आमरण उपोषण चालू केले आहे. या उपोषणस्थळास शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शाहूवाडी पन्हाळ्याचे माजी आमदार सत्यजित पाटील यांनी भेट दिली.

या भेटी वेळी माजी आमदार सत्यजित पाटील यांनी उपोषणकर्त्यांना पाटील मराठा आरक्षणासाठी सरकारने दिलेली मुदत संपेपर्यंत तसेच उपोषणास बसलेल्यापैकी वसंत पाटील हे ७५ वर्षाचे असलेने त्यांच्या तब्बेतीच्या काळजीपोटी उपोषण स्थगित करण्याचे आवाहन केले.

जाफळे, ता. पन्हाळा येथील वसंत रंगाराव पाटील व सुरेश चंदर जगदाळे या उपोषणकर्त्यांच्या भेटीवेळी सत्यजित पाटील हे सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे. जर सरकारला उपोषण करणारांची काळजी असती, तर महिन्यापूर्वी दिलेल्या निवेदनाचा त्यांनी विचार केला असता. व सत्तेतील आमदार, खासदार, पालकमंत्री यांनी उपोषण टाळण्यासाठी तुमची भेट घेतली असती.

त्यामुळे या सरकारला मराठा आरक्षणाशी काही देणेघेणे नाही हेच दिसून येते अशी टीका केली. त्यामुळे त्यांनी मनोज जरांगे-पाटील यांना सरकारने दिलेली मुदत संपेपर्यंत उपोषण स्थगित करण्याचे आवाहन केले.

पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे-जाधव यांनी उपोषण स्थळी भेट दिली. त्यावेळी त्यांनी आरक्षणाचा निर्णय हा धोरणत्मक व शासन स्तरावरील आहे. त्यामुळे तुमच्या मागण्या सत्वर वरिष्ठ कार्यालयास पोहचविल्या आहेत. तरी आपण चालू असलेले उपोषण थांबवावे असे आवाहन केले.

पण माजी आमदार, तहसीलदार यांच्या आवाहनावर प्रतिक्रिया देताना उपोषणकर्त्यांनी मराठा आरक्षण मिळवण्यासाठी व मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही दोघे बसलो आहोत. त्यामुळे मराठा आरक्षण मिळाल्या खेरीज आम्ही हे उपोषण सोडणार नसलेचे पाटील व जगदाळे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()