'या' महाविद्यालयाची इमारत महाराष्ट्र हद्दीत, तर काॅलेजच्या पायाऱ्या आहेत कर्नाटक हद्दीत..; जाणून घ्या कोणतं College?

सीमाभागातील मराठी भाषिकांना महाराष्ट्र शासनाच्या सवलती मिळाव्यात यासाठी महाविद्यालयाची इमारत महाराष्ट्र हद्दीत बांधण्यात आली.
Marathi Bhasha Gaurav Din Devchand College Arjunnagar
Marathi Bhasha Gaurav Din Devchand College Arjunnagaresakal
Updated on
Summary

महाराष्ट्रातील महाविद्यालयांना सवलती नाहीत, अशा खास सवलती विशेष बाब म्हणून महाराष्ट्र शासनाने देवचंद महाविद्यालयाला दिल्या आहेत.

निपाणी : अर्जुननगर (ता. कागल) येथील जनता शिक्षण मंडळाच्या (Janata Shikshan Mandal) माध्यमातून स्थापन झालेले देवचंद महाविद्यालय (Devchand College Arjunnagar Nipani) सीमावासीय विद्यार्थ्यांसाठी प्रमुख आधारवड ठरले आहे. खरेतर देवचंद महाविद्यालय आणि संस्थेच्या अन्य शाखांमुळे सीमाभागातील मराठी भाषा आणि संस्कृती टिकविण्यासाठी चांगला फायदा झाला आहे.

महाविद्यालयात सीमाभागातील तीन पिढ्या घडल्या, तयार झाल्या, आजही संस्थेच्या शाखांमध्ये दहा हजारांवर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कुसुमाग्रज यांनी मराठी अस्मिता आणि भाषा टिकविण्यासाठी मराठी (Marathi Bhasha Gaurav Din) जपण्याचा संदेश दिला, तो संदेश देवचंद महाविद्यालयाने आजवर जपला आहे.

Marathi Bhasha Gaurav Din Devchand College Arjunnagar
Marathi Bhasha Din : सीमाभागात मराठीसाठी कार्यरत संस्थांना हवे पाठबळ; महाराष्ट्र सरकारच्या 'या' निर्णयाची अंमलबजावणीच नाही

निपाणीसह सीमाभागात (Nipani Border) १९६० च्या सुमारास उच्च शिक्षणाची सोय नव्हती. निपाणी परिसर मराठी भाषिकांचा प्रदेश असल्याने यावेळी गरज ओळखून माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, माजी गृहमंत्री स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्या सहकार्याने आणि पद्मभूषण देवचंद शाह व त्यांच्या सहाकाऱ्यांच्या पुढाकाराने येथे देवचंद महाविद्यालय स्थापन झाले. सीमाभागातील मराठी भाषिकांना महाराष्ट्र शासनाच्या सवलती मिळाव्यात यासाठी महाविद्यालयाची इमारत महाराष्ट्र हद्दीत बांधण्यात आली. तर महाविद्यालयाचे उद्यान, बाग कर्नाटक हद्दीत निर्माण केले आहे. विशेष म्हणजे या महाविद्यालयाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने सीमाभागातील विद्यार्थ्यांचे पालकत्व स्विकारले आहे.

Marathi Bhasha Gaurav Din Devchand College Arjunnagar
Marathi Bhasha Gaurav Din : मराठी भाषा धोरणाची ११ वर्षांनंतरही होऊ शकली नाही अंमलबजावणी

एवढेच नव्हे तर महाराष्ट्रातील महाविद्यालयांना सवलती नाहीत, अशा खास सवलती विशेष बाब म्हणून महाराष्ट्र शासनाने देवचंद महाविद्यालयाला दिल्या आहेत. याचा फायदा सीमाभागातील तीन पिढ्यांना झाला आहे. प्रामुख्याने महाराष्ट्र शासनाने सीमाविसायांसाठी ईबीसी (आर्थिक मागास) सवलत लागू केल्याने नाममात्र शुल्कात येथे प्रवेश मिळतो. त्यासाठी महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीकडून सीमाभागातील विद्यार्थी महाराष्ट्रातील असल्याचा दाखल देण्याची सोय केली आहे. याशिवाय अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शाखेत महाविद्यालयाच्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी २५ जागा राखीव आहेत.

याचा आजवर महाविद्यालयातील असंख्य विद्यार्थ्यांना लाभ झाला. केवळ शिक्षण देण्यापुरते नव्हे तर शिक्षण घेतल्यावरही नोकरी देताना देवचंद महाविद्यालयाचा विद्यार्थी म्हणून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, माजी मंत्री स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांनी हजारो विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिल्या. ग. प्र. प्रधान यांनी देवचंद महाविद्यालयात मराठी भाषेचे पदव्युत्तर वर्ग सुरु व्हावेत, यासाठी त्यावेळी महाराष्ट्र विधीमंडळात आवाज उठविला. त्यानंतर खास बाब म्हणून त्वरीत देवचंद महाविद्यालयात पदव्युत्तर मराठी विभाग सुरु झाला.

Marathi Bhasha Gaurav Din Devchand College Arjunnagar
Marathi Bhasha Din: कशी निर्माण झाली मराठी भाषा? जाणून घ्या हजार वर्षांचा इतिहास

त्यामुळे निपाणीसह सीमाभागातील हजारो विद्यार्थी मराठी भाषेत एम. ए. झाले. सध्या विविध शाखांद्वारे दहा हजारावर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कोकणात विविध ठिकाणी सेवेत असणारे बहुसंख्य शिक्षक हे देवचंद महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. एकूणच मराठीपण जपून मराठी टिकविण्यासाठी महाविद्यालयाने अविरत योगदान दिले आहे. त्याला येथील सर्वस्तरातील विद्यार्थ्यांसह पालकांचे सदैव सहकार्य लाभले आहे. कालानुरूप महाविद्यालयात अन्य तंत्र शिक्षणाच्या शाखा सुरु झाल्या आहेत.

Marathi Bhasha Gaurav Din Devchand College Arjunnagar
Marathi Bhasha Gaurav Din : मराठी भाषा गौरवदिन अन् मराठी राजभाषा दिन फरक माहितीये? जाणून घ्या

जनता शिक्षण मंडळ संचालित शाखा

  • देवचंद महाविद्यालय

  • मोहनलाल दोशी विद्यालय

  • मराठी कॉन्व्हेंट स्कूल

  • किरणभाई शाह विद्यानिकेतन

  • जनता शिक्षण मंडळ औद्योगिक प्रशिक्षण केंद्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.