'विशाळगडावर तोडफोड करणाऱ्यांकडे पोलिसांनी..'; आरोप करत काय म्हणाल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या?

Marxist Communist Party : देशात सध्या मनुवादी विचार पेरले जात आहेत. तिसरी व सहावीच्या पुस्तकातील संविधान उद्देशिकाचा मजकूर काढला आहे.
Marxist Communist Party leader Subhashini Ali
Marxist Communist Party leader Subhashini Aliesakal
Updated on
Summary

'लोकांना धर्माच्या नावाखाली लोकांना वेड केले जात आहेत. त्यापासून सावध राहिले पाहिजे.'

कोल्हापूर : केंद्रातील व राज्यातील सत्ताधारी पक्ष जातीय तेढ निर्माण होण्यास खतपाणी घालत आहेत. त्यांनीच महाराष्ट्र अशांत केला आहे, असे सत्ताधारी पक्ष संविधानविरोधी (Constitution) आहेत. त्यांना धडा शिकविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराजांचे विचार अधिक प्रभावीपणे जोपासले पाहिजेत, अशी अपेक्षा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (Marxist Communist Party) पॉलिट ब्युरो सदस्य व माजी खासदार सुभाषिणी अली यांनी येथे व्यक्त केली.

येथील इंडिया आघाडीतर्फे (India Alliance) येथील शाहू स्मारक भवनात सामाजिक सलोखा सभा घेण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. डॉ. उदय नारकर अध्यक्षस्थानी होते. अली (Subhashini Ali) म्हणाल्या, ‘देशात सध्या मनुवादी विचार पेरले जात आहेत. तिसरी व सहावीच्या पुस्तकातील संविधान उद्देशिकाचा मजकूर काढला आहे. यातून सत्ताधाऱ्यांकडून संविधान नाकारण्याचे प्रयत्न होत आहेत. समानता व असमानता, प्रतिगामी व पुरोगामी असे भेद वाढवले जात आहेत.

Marxist Communist Party leader Subhashini Ali
'विशाळगडावर ज्यांनी तोडफोड केली, त्यांच्यावर दहशतवादी कृत्याचे कलम लावून कारवाई करा' : आमदार अबू आझमी

पोलिसांकडून तोडफोड करणाऱ्याकडे डोळेझाक झाली. यातून सत्ताधाऱ्यांना धर्माधाारित राष्‍ट्र उभारणी करायची आहे, हेच उघड होत आहे. त्यासाठी लोकांना धर्माच्या नावाखाली लोकांना वेड केले जात आहेत. त्यापासून सावध राहिले पाहिजे. धर्माच्या नावाखाली स्थापन होणाऱ्या राज्यात शोषण नवी व्यवस्था निर्माण होईल. बेरोजगारांना काम देण्याऐवजी त्यांना धर्म रक्षणाच्या कार्यात गुंतवत त्यांच्या हाती लाठी दिली जात आहे. अशा प्रकारापासून युवकांनी सावध व्हावे.

Marxist Communist Party leader Subhashini Ali
Textile Industry : बांगलादेशातील स्थितीमुळे भारतातील वस्रोद्योगाला 'बरकत'; वस्रोद्योग कंपन्यांचे शेअर्सही वधारले

डॉ. नारकर म्हणाले, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरील बंदी उठवल्यानंतर प्रशासनातील काही अधिकारी संविधानाची अंमलबजवणी करण्यात कितपत सक्षम रहातील याची शंका आहे. त्यामुळे संविधान रक्षणासाठीचा लढा व्यापक करावा लागणार आहे.’ भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव सतिश्चंद्र कांबळे, उद्धव ठाकरे गटाचे विजय देवणे, चंद्रकांत यादव, भरत रसाळे, भारती पोवार, ए. बी. पाटील, अनिल घाटगे, एम. जे. शेख, सुवर्णा तळेकर, प्रा. सुभाष जाधव उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.