कोल्हापुरात माझा विद्यार्थी, माझी जबाबदारी मोहीम यशस्वी करा

पालकमंत्री सतेज पाटील यांचे आवाहन; शिक्षकांनी प्रभावीपणे राबवावी
कोल्हापुरात माझा विद्यार्थी, माझी जबाबदारी मोहीम यशस्वी करा
Updated on

कोल्हापूर : कोरोनाची तिसऱ्या लाटेचा (third stage of covid - 19) धोका लहान मुलांना अधिक असल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली आहे. या लाटेचा प्रभावीपणे सामाना करण्यासाठी 'माझा विद्यार्थी माझी जबाबदारी' (maza vidhyarthi, mazi jababdari) अशी मोहमी राबविण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि इतर माध्यमातील शिक्षकांनी प्रभावी योगदाना द्यावे, जिल्ह्यातील विद्यार्थी वर्ग आरोग्याच्या दृष्टीने तंदुरस्त रहाण्यास हातभार लावावा असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील ((satej patil) यांनी आज केले. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता गृहीत धरून त्याचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहूजी सभागृहात व्ही.सी. व्दारे घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी पाटील म्हणाले, ‘‘ जिल्ह्यात प्राथमिक स्तरावर सध्या १५० ॲक्सिजन बेड (oxygen bed) तयार केले आहेत. १८ वर्षाखालील व्याधीग्रस्त विद्यार्थी-विद्यार्थीनींची यादी शिक्षण आरोग्याशी संबधीत यंत्रणांनी आठ दिवसात तयार करावी. त्यासोबत कोरोनाकाळात मुले घाबरणार नाहीत याची काळजी घ्यावी. त्यासाठी शिक्षकांनी ऑनलाईन प्रणालीव्दारे विद्यार्थ्यांना समुपदेशन करावे, त्यासाठी किमान एक तास राखीव ठेवावा.’’ कोरोनाकाळात येणाऱ्या संकटाला परतविण्यासाठी जिल्हा यंत्रणा सज्ज आहे त्यामुळे पालकांनी घाबरून जावू नये. असे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

कोल्हापुरात माझा विद्यार्थी, माझी जबाबदारी मोहीम यशस्वी करा
'मोदी सरकारची सात वर्षे भुलभुलैय्याची'

पुढे ते म्हणाले, ‘‘ संभाव्य लाट परतविण्यासाठी शिक्षक, पालक, आरोग्य यंत्रणा व संबंधित घटकांनी एकत्रित प्रयत्न करावेत. पालकांनीही जबाबदारीने वागावे. शिक्षकांनी स्वत:चीही काळजी घ्यावी. या लाटेत लहान मुलांची काळजी कशी घ्यावी यासाठी येत्या चार दिवसात दिशा ठरवली (प्रोटोकॉल) जाईल. त्याची अंमलबजावणी करावी लागेल.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.