कोल्हापूर : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) सभा सुरु होण्यापूर्वीच गोकुळ बचाव कृती समितीचे कार्यकर्ते आणि विरोधक आक्रमक झाले आहेत. कागल पंचतारांकित एम. आय. डी. सी. परिसरातील महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना येथे दुपारी १ ला सभा होणार आहे. सभागृहात लावलेले सीसीटीव्ही विरोधकानांवरच लावले आहेत. तसचे सभासद बसतात त्या ठिकाणी पुढच्या रांगेत बसवले आहे. त्यामुळे सभेचे नियोजन करणाऱ्यांना विरोधक धारेवर धरत गोकुळ वादाला सुरुवात झाली आहे.
सत्तारूढ संचालकांकडून गोकुळमध्ये होत असलेल्या कारभाराबाबत गेल्या काही दिवसांपासून समाचार घेतला जात आहे. याला सडेतोड उत्तर सत्तारूढ संचालकांनी दिले आहे. दरम्यान, विरोधकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याबाबत वरिष्ठ नेत्यांनी सूचना दिल्याने संचालकांनीही प्रश्नांच्या उत्तरांची तयारी केली आहे. विरोधकांनी गोकुळच्या लेखापरीक्षण अहवालात अनेक आक्षपार्ह बाबी निदर्शनास आल्या आहेत, असा आरोप केला आहे. यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे मात्र जिल्हा दूध संघाची सभा सुरू होण्यापूर्वीच गोकुळ बचाव कृती समितीचे कार्यकर्ते आणि विरोधक आक्रमक झाले आहेत.
संपादन- अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.