महाराष्ट्रात 60 स्थलांतरित पक्षांचा मुक्काम लांबला

महाराष्ट्रात 60 स्थलांतरित पक्षांचा मुक्काम लांबला
Updated on

कोल्हापूर : वाहनांचा आवाज नाही, घाई-गडबड-गोंधळ नाही, लोकांची ये-जा नाही, कोरोना (Covid 19 LOckdown) लॉकडाउनमुळे परिसरात निर्माण झालेली शांतात, कमीत कमी मानवी हस्तक्षेप, गाळांची भरपूर उपलब्धता, पाणी आदी घटकांमुळे शहरातील रंकाळा, राजाराम तलाव, न्यू पॅलेस (Rankala, Rajaram Lake, New Palace)आदी ठिकाणच्या जलस्रोतांत विसावलेल्या स्थानिक अन्‌ काही स्थलांतरीत पाणथळ पक्ष्यांचा मुक्काम लांबला आहे. मे-जून आला तरी काही पक्ष्यांनी आपले ठिकाण अजूनही सोडलेले नाही.

पर्यावरणीयदृष्ट्या ही चांगली नांदी आहे, असे मत अनेक पक्षीतज्ज्ञांनी व्यक्त केले. शांत तलावांच्या ठिकाणी अनेक पक्षी निवांतपणे भक्ष्य शोधत दिवस व्यतित करत आहेत. कोरोना लॉकडाऊनचा परिणाम अखंड जीवसृष्टीवर सकारात्मक पद्धतीने झाल्याचे दिसते. जसे पाणथळ पक्षी तसे छोटे किटक, प्राणी, अन्य पक्ष्यांनाही असा निवांतपणा लाभला आहे. विशेष म्हणजे, अशा पक्ष्यांची संख्या अनेक जलस्रोत वाढताना आढळली आहे. पक्ष्यांच्या किलबिलाटाने परिसर बहरून गेला आहे.

परिसरातील तलाव कोणते?

शहरात अन्‌ परिसरात २२ ते २३ तलावांची नोंद होती. कालांतराने या तलावात भर टाकली. काही तलाव हळूहळू नष्ट होत गेले. आजूबाजूला वस्ती वाढली. काही तलावांचे अस्तित्व अजूनही टिकून आहे. यात रंकाळा, कळंबा, राजाराम, न्यू पॅलेस, वडणगे, रुकडी, बहिरेश्‍वर, तळसंदे, कागलचा जयसिंगराव तलावांचा समावेश आहे. स्थानिक अन्‌ स्थलांतरी पक्षी या तलावाच्या काठाने दिसतात. पुलाची शिरोली इथे तलाव आहे; पण शेजारी एमआयडीसी शिरोलीतील उद्योगांमुळे आवाज, काही रसायने या तलावात येतात.

महाराष्ट्रात ६० स्थलांतरित पक्षी

भारतात २३० प्रजातीचे पक्षी स्थलांतर करून येतात; तर महाराष्ट्रात ही संख्या ६० च्या आसपास असते.

उड्डाण मार्ग कोणते?

मध्य आशियाई उड्डाण मार्ग

जगात असे आठ उड्डाण मार्ग

काही पक्षी स्थानिक, काही आंतरराष्ट्रीय स्थलांतर करुन येतात

पक्षी येण्याचा काल/मार्ग

ऑक्टोबर ते मार्च

मंगोलिया, कझाकस्थान, रशियासह अतिथंड प्रदेश.

परिसरातील तलाव हे पक्ष्यांचे नैसर्गिक अधिवास आहेत. काळाच्या ओघात काही तलाव नष्ट झाले आहेत. जे तलाव आहेत, त्यांची जपणूक आपण केली पाहिजे.

-सुहास वायंगणकर, वन्यजीव महामंडळाचे सदस्य

पाणथळ पक्ष्यांचे खाद्य

पाणथळ जागेत १०८ सूक्ष्म वनस्पती असतात

क्‍लोरोफायसी, बॅसिलोरॅलीफायसी, सायनोफायसी कुळातील (हरित नील शैवाल) प्रजाती आढळतात

प्लॉनटा (प्लवंग), कारा, नायटेला, स्पायरोगायरा ही मोठी शैवाले

अझोला कल्चर

कवचवर्गीय प्राणी, खेकडे, झिंगे, सूक्ष्म जीव, सेंद्रिय पदार्थ

पाणथळ पक्षी

आता असलेले पक्षी : ग्रे हेरॉन, पर्पल हेरॉन, कार्मोरंट, स्पोटेड बील डक, शेकाट्या, नाम्या

तलावाच्या काठावर : ग्रीन सँडपायपर, वुड सँडपायपर, कॉमन सँडपायपर, तुतवार, कॉमन स्नाईफ, ग्रीन शँक

तलावाच्या माळरानालगत : ब्राऊन श्राईक, बुटेड स्वॅबलर, रिड वॅबलर, ब्लिथ वॅबलर, यलो वॅबलर, व्हाईट वॅबलर

शिकारी पक्षी : ऑस्प्रे, मार्श हॅरियर, थोशियन, स्पॅरो हॉक

इन्टरनॅशनल युनियन ऑफ कॉन्झर्व्हेशन नेटवर्कने संकटग्रस्त पक्ष्यांची यादी तयार केली आहे. यादीतील पेंटेड स्टोर्क, वुली नेकड स्टोर्क, रिव्हर्स स्टर्न, ब्लॅक रिडेड आयबीस, नॉर्थर्न शॉवेलर, रुडी शेकड पक्ष्यांचा समावेश आहे. हे सर्व संकटग्रस्त पक्षी परिसरात येतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()