अरुण नरके यांनी मुलाच्या डोक्यावर हात ठेवावा ; विरोधकांचे आव्हान

  milk producers association gokul meetings update kolhapur marathi news
milk producers association gokul meetings update kolhapur marathi news
Updated on

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सभेत प्रचंड गोंधळ झाला.गेल्यावर्षी ची सभा झाली नाही त्या सभेचे प्रोसिडिंग वाचलेच कसे यावरून सत्ताधार्‍यांना धारेवर धरले आणि गोंधळाला सुरुवात झाली. तर अध्यक्ष अरुण नरके यांना मुलाच्या डोक्यावर हात ठेऊन गेल्या वर्षी सभा झाली अशी शपथ घेण्याची मागणी केल्याने गोंधळात आणखीन भर पडली.

गोकुळ दूध संघाची सभा सुरू झाल्यानंतर पहिला विषय मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करणे हा  विषय होता. त्याप्रमाणे प्रोसिडिंग वाचण्यास सुरुवात झाली.मात्र गेल्या वर्षीची सर्व सभा गुंडाळली असताना यावर्षी मात्र त्याचे प्रोसिडिंग कसे काय लिहिले असा जाब विचारण्यात आला. मात्र या सभेला मंजुरी मिळाली आहे. तसेच शासनाने मंजुरी केली आहे असे सांगून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला.  

समर्पक उत्तर न मिळाल्याने वादाला सुरूवात झाली. यावेळी सभेचे अध्यक्ष अरुण नरके यांनी स्वतःचा मुलगा चेतन याच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेऊन सांगावे की गेल्या वर्षी सभा झाली. असे विरोधकांनी आव्हान  करताच गोंधळात आणखीन वाढ झाली. यावेळी आम्ही सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार आहोत त्यामुळे सर्वांनी शांतता पाळावी असे आवाहन नरके यांनी केले.

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळची 58 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहत मधील खाद्य विभागाच्या मैदानावर घेण्यात आली. या सर्वसाधारण सभेचे वैशिष्ट्य म्हणजे कोणीही नेते मंडळी या सभेस उपस्थितीत नव्हते. कार्यकारी संचालक दत्तात्रय घाणेकर यांनी प्रास्ताविक केले. चेअरमन रवींद्र आपटे यांची छोटीशी शस्त्रक्रिया झाली असल्यामुळे ते सभेस उपस्थित राहू शकणार नसल्याचे जाहीर केले. त्यानंतर ठराव करून अध्यक्ष आणि तज्ञ अरुण नरके यांना चेअरमनपद देण्यात आले. 

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.