कोल्हापूर - हद्दवाढीच्या तांत्रिक अडचणी दूर करू : एकनाथ शिंदे

कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्यासंदर्भात दिवाळीनंतर मंत्रालयात व्यापक बैठक घेऊ
कोल्हापूर - हद्दवाढीच्या तांत्रिक अडचणी दूर करू : एकनाथ शिंदे
Updated on
Summary

कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्यासंदर्भात दिवाळीनंतर मंत्रालयात व्यापक बैठक घेऊ

कोल्हापूर : कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्यासंदर्भात दिवाळीनंतर मंत्रालयात व्यापक बैठक घेऊ, हद्दवाढ करण्यात असणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करू असे आश्वासन राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. हद्दवाढ समर्थन कृती समितीच्या शिष्टमंडळाला त्यांनी आज मंगरायाची वाडी येथील हेलिपॅडवर भेट दिली. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रकांत जाधव, कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार आदींनी हद्दवाढ ही काळाची गरज आहे, असे सांगत काही झाले तरही हद्दवाढ करा असा आग्रह धरला. यावेळी महापालिका प्रशासन डॉ. कादंबरी बलकवडे यांनी आतापर्यंत महापालिकेने राज्य शासनाला दिलेल्या हद्दवाढीच्या प्रस्तावाची माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.