'विधानसभा निवडणुकीत तुमचा भाऊ, मुलगा समजून ओट्यात घ्या आणि मायेची उब द्या'; हसन मुश्रीफांचं भावनिक आवाहन

मुश्रीफ यांच्यासारखे नेतृत्व लाभावे, ही आपणा सर्वांची पुण्याई आहे.
Minister Hasan Mushrif
Minister Hasan Mushrif esakal
Updated on
Summary

'मला तुम्ही कंटाळला तर नाही ना? मला कंटाळला असाल तर जरूर स्पष्टपणे सांगा. दुसरा कुणीतरी उमेदवार काढू. माझ्या चुकासुद्धा तोंडावर सांगा, माफी मागेन.'

कागल : ‘आगामी विधानसभा निवडणुकांच्या रूपाने मी सातव्यांदा विधानसभा निवडणुकीला सामोरा जात आहे. गेल्या सहा निवडणुकांप्रमाणेच या निवडणुकीतही मला आशीर्वाद द्या. तुमचा भाऊ आणि मुलगा समजून ओट्यात घ्या आणि मायेची उब द्या’, असे भावनिक आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केले. ‘निवडणुकीच्या तयारीची सुरुवात म्हणून गावागावांत वाड्या-वस्त्यांवर जनतेपर्यंत पोहोचा,’ असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघ (Kagal Assembly Election) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मुश्रीफ बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘गोकुळ’चे संचालक युवराज पाटील होते. पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘गेली ४० वर्षे सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये जनतेने मला भरभरून दिले आहे. त्यापैकी तुम्ही मला २५ वर्षे आमदारकी दिली, या काळात १९ वर्षे मंत्रिपदी राहिलो. आपला आमदार भेटावा, ही सर्वसामान्य जनतेची अपेक्षा असते. संपर्कामध्ये कधीही कमतरता ठेवली नाही.

Minister Hasan Mushrif
NCP Politics : साताऱ्यात राष्ट्रवादीने गमावले 'इतके' आमदार-खासदार; बालेकिल्ला पुन्हा बांधण्याची गरज, पक्षाची पडझड

सामान्यातील सामान्य अगदी एक जरी माणूस येऊन म्हणाला की, मी घरात असून भेटलो नाही किंवा फोन उचलला नाही तर या निवडणुकीचा अर्ज सुद्धा भरणार नाही. जनतेने मला जी संधी दिली त्यामध्ये व्यक्तिगत कामे व योजना प्रभावीपणे राबविल्या. मी संपूर्ण आयुष्य गोरगरीब सर्वसामान्य जनतेसाठी खर्ची घातली आहे. येत्या विधानसभेला फक्त शंभर दिवस शिल्लक राहिले आहेत. या शंभर दिवसांत इर्ष्‍येने पेटून उठा, जनतेच्या घरोघरी पोहोचा. परगावच्या मतदानाची यादी तयार करा. हे शंभर दिवस तुम्ही माझ्यासाठी देणार असाल तरच फॉर्म भरूया. विधानसभा मतदारसंघातील बेरोजगारी हटविण्यासाठी कायमच प्रयत्नशील राहिलो. येत्या पाच वर्षांत एक मोठा कारखाना उभा करू. ज्यामध्ये दोन हजारांहून अधिक बेरोजगारांना रोजगार मिळेल.’

भैया माने म्हणाले, ‘मुश्रीफ यांच्यासारखे नेतृत्व लाभावे, ही आपणा सर्वांची पुण्याई आहे. या मेळाव्याचे नियोजन करीत असताना काल रात्रीपासूनच या हंगामाची सुरुवात जोरदार पावसाने झाली आहे. मुश्रीफ यांच्या विधानसभा निवडणुकीतही असाच मतांचा पाऊस पाडूया.’ यावेळी गडहिंग्लजचे माजी उपनगराध्यक्ष किरण कदम, चंद्रकांत पाटील, विजय काळे आदींची भाषणे झाली. येथील देवराज बेळकट्टी यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी समरजितसिंह घाटगे यांच्या गटातून मुश्रीफ गटांमध्ये प्रवेश केला. त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्‍यात आला.

Minister Hasan Mushrif
Ramdas Athawale : गाव ढालेवाडी अन् मंत्रिपदाची सुसाट गाडी; सांगली जिल्ह्याचे सुपुत्र रामदास आठवले झाले पुन्हा केंद्रात मंत्री

व्यासपीठावर ‘गोकुळ’चे संचालक नवीद मुश्रीफ, तात्यासाहेब पाटील, वसंतराव धुरे, शशिकांत खोत, प्रवीणसिंह भोसले, विकास पाटील, सिद्धार्थ बन्ने, संजय चितारी, सदानंद पाटील, बाळासाहेब देसाई, अनुप पाटील, दीपक देसाई, डी. एम. चौगुले, सूर्यकांत पाटील, काशिनाथ तेली, प्रकाश गाडेकर, आदी उपस्थित होते. स्वागत नितीन दिंडे यांनी केले. सूत्रसंचालन विवेक गवळी यांनी केले. आभार विकास पाटील यांनी मानले.

तुम्हीच आमचा हक्काचा माणूस...

मुश्रीफ म्हणाले, ‘मला तुम्ही कंटाळला तर नाही ना? मला कंटाळला असाल तर जरूर स्पष्टपणे सांगा. दुसरा कुणीतरी उमेदवार काढू. माझ्या चुकासुद्धा तोंडावर सांगा, माफी मागेन. लोकप्रतिनिधी म्हणून जनतेचे शंभर टक्के समाधान करता येत नाही; परंतु काही राहून गेले असल्यास जरूर सांगा. त्याची पूर्तता करण्याचाही प्रयत्न करू.’ त्यावर उपस्थित कार्यकर्ते म्हणाले, ‘साहेब...‌! ‘तुम्हीच आमचा हक्काचा माणूस’, ‘तुम्हीच गोरगरिबांचा कैवारी.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.