Kagal : महायुतीच्या जागा वाटपापूर्वीच कागलमध्‍ये ठिणगी; मुश्रीफांनी फुंकले रणशिंग, समरजितसिंह घाटगेंची भूमिका ठरणार महत्त्वाची

समरजितसिंह यांनी तर भाजपमधून बंडखोरी करीत निवडणूक लढविली होती.
Hasan Mushrif Samarjeetsingh Ghatge
Hasan Mushrif Samarjeetsingh Ghatgeesakal
Updated on
Summary

२०१९ च्या निवडणुकीत ही जागा त्यावेळच्या भाजप-सेना युतीत शिवसेनेकडे होती. राष्ट्रवादीकडून मुश्रीफ यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर समरजितसिंह यांनी बंडखोरी करून ही निवडणूक लढविली.

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत (Kolhapur Lok Sabha Election) महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांना महायुतीतील नेत्यांनी फसविल्याचा आरोप-प्रत्यारोप समाजमाध्यमांवरून होत असतानाच विधानसभेतील महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय होण्यापूर्वीच पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी या निवडणुकीचे रणशिंग कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातून फुंकले. मुश्रीफ यांच्या या निर्णयाने महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मुश्रीफ यांच्या या निर्णयाने या मतदारसंघातील भाजप नेते समरजितसिंह घाटगे (Samarjit Singh Ghatge) यांच्यासह माजी आमदार संजय घाटगे यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. गेल्या निवडणुकीत हे दोघेही मुश्रीफ यांच्या विरोधात मैदानात होते. समरजितसिंह यांनी तर भाजपमधून बंडखोरी करीत निवडणूक लढविली होती.

लोकसभेच्या निवडणुकीत मंडलिक-मुश्रीफ-राजे गट एकत्र होते. त्यामुळे प्रा. मंडलिक यांना या एका मतदारसंघातून किमान ७० ते ८० हजारांचे मताधिक्य मिळेल, असा अंदाज बांधला गेला. प्रत्यक्षात या मतदारसंघातून प्रा. मंडलिक केवळ १५ हजारांचे मताधिक्य घेऊ शकले. निकालानंतर यावरूनच कागलमध्ये समाजमाध्यमांवर कोणी प्रा. मंडलिक यांना फसविले याची चर्चा सुरू झाली. यावर मुश्रीफ यांनी खुलासा केला; पण राजे गटाकडून प्रतिक्रिया आलेली नाही आणि प्रा. मंडलिक यांनीही कोणावर टीका केलेली नाही.

Hasan Mushrif Samarjeetsingh Ghatge
'विधानसभा निवडणुकीत तुमचा भाऊ, मुलगा समजून ओट्यात घ्या आणि मायेची उब द्या'; हसन मुश्रीफांचं भावनिक आवाहन

लोकसभेच्या मताधिक्यावरून समाजमाध्यमांवरील टिकाटिप्पणी सुरू असतानाच आज मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन थेट विधानसभेचे रणशिंग फुंकले. वर्षभरापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्‍वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात भाजपसोबत गेली. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत राज्यातील २८८ मतदारसंघांत जागा वाटपाचा निर्णय हा महायुतीत सहभागी नेत्यांच्या उपस्थितीतच होईल. त्याला अजून खूप उशीर आहे; पण तत्पूर्वीच मुश्रीफ यांनी लढण्याची घोषणा करून समरजितसिंह घाटगे यांचीच पंचाईत केल्याचे बोलले जाते. विद्यमान म्हणून मुश्रीफ यांनाच महायुतीकडून उमेदवारी मिळेलही पण नेत्यांच्या आदेशाची वाट न बघता त्यांनी घोषणा केल्याने समरजितसिंह यांची कागलच्या राजकारणातील भूमिका महत्त्‍वाची ठरणार आहे.

पक्षापेक्षा गटातटाच्या राजकारणाला महत्त्‍व असलेल्या या मतदारसंघात युतीकडून मुश्रीफ हेच उमेदवारीचे प्रबळ दावेदार आहेत. पण, समरजितसिंह घाटगे हेही गेल्या पाच वर्षांपासून निवडणुकीची तयारी करीत आहेत. ज्यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाने भाजपला पाठिंबा दिला, त्यावेळी नाराज असलेल्या समरजितसिंह यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समजूत काढून विधानसभेला बघू, असा शब्द दिला होता. त्यातून ते पुन्हा सक्रिय झाले. पण, आता मुश्रीफ यांनी लढण्याची घोषणा केल्याने फडणवीस यांचे नेतृत्‍व मानणारे समरजितसिंह काय करणार? हा प्रश्‍न आहे. या निवडणुकीला अजून उशीर आहे. प्रत्यक्ष निवडणूक जाहीर झाल्यावर लढतीचे चित्र स्पष्ट होईल.

Hasan Mushrif Samarjeetsingh Ghatge
Murlidhar Mohol : पुण्याच्या खासदाराने कोल्हापुरात गिरविले कुस्तीचे धडे; केंद्रीय मंत्रिमंडळात मोहोळ यांच्या रूपाने राज्याचा पहिला मल्ल

‘मविआ’ कडून अंबरिश घाटगे

२०१९ च्या निवडणुकीत ही जागा त्यावेळच्या भाजप-सेना युतीत शिवसेनेकडे होती. राष्ट्रवादीकडून मुश्रीफ यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर समरजितसिंह यांनी बंडखोरी करून ही निवडणूक लढविली, त्यात त्यांना ८८ हजार मते मिळाली. आता शिवसेनेत फूट पडल्याने शिंदे सेनेकडे उमेदवारच नाही. त्याचवेळी उद्धव ठाकरे गटांकडून या मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून माजी आमदार संजय घाटगे यांचे पुत्र अंबरिश यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. ‘अपराजित नेतृत्व’ असे अंबरिशसिंह यांची ओळख आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट व ठाकरेंच्या शिवसेनेच्या ताकदीवर ते या मतदारसंघात आव्हान निर्माण करू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.