आता गोंधळ घालणारे पालघरमध्ये साधूंची हत्या झाली, तेव्हा कुठे होते? सामंतांचा ठाकरेंसह विरोधकांना सवाल

जुने फोटो दाखवून त्याचे खापर मुख्यमंत्र्यांवर फोडणे आणि त्यांची बदनामी करणे योग्य नाही.
Uday Samant vs Uddhav Thackeray
Uday Samant vs Uddhav Thackerayesakal
Updated on
Summary

पूर्ववैमनस्यातून गोळीबाराची घटना घडली आहे. ती घटना दुर्दैवी आहे. मात्र, त्याबाबत गृहमंत्र्यांचा राजीनामा मागणे योग्य नाही.

कोल्हापूर : ‘काल घडलेला गोळीबाराचा प्रसंग दुर्दैवी आहे. तो वैयक्तिक वादातून घडला आहे. ते ‘उबाठा’मधील (Uddhav Thackeray) गँगवॉर असून दुसऱ्याच्या माथी कशाला मारत आहात? या प्रसंगावरून आता गोंधळ घालणारे पालघरमध्ये (Palghar) अनेक साधूंची हत्या झाली तेव्हा कुठे होते?’ असा सवाल उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आज विरोधकांबाबत उपस्थित केला.

Uday Samant vs Uddhav Thackeray
दानवेंच्या कोल्हापुरातील स्टंटबाजीला छत्रपती संभाजीनगरात येऊन उत्तर देणार; क्षीरसागरांचा गर्भित इशारा

‘दालन’ प्रदर्शनाच्या उद्‌घाटनावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री सामंत म्हणाले, ‘काल झालेल्या गोळीबाराच्या प्रसंगाचे आम्ही समर्थन करत नाही. मात्र, जुने फोटो दाखवून त्याचे खापर मुख्यमंत्र्यांवर फोडणे आणि त्यांची बदनामी करणे योग्य नाही. चांगले झाले की, आम्ही केले आणि वाईट झाले की, मुख्यमंत्र्यांनी केले असे म्हणण्याची प्रवृत्ती सध्या वाढत असून ती बंद व्हावी.

Uday Samant vs Uddhav Thackeray
Hasan Mushrif : लोकसभा निवडणूक कधी आणि किती टप्प्यांत होणार? पालकमंत्री मुश्रीफांनी दिली महत्त्वाची अपडेट

गोळीबार करणाऱ्या आणि त्यात असलेल्या तिसऱ्या व्यक्तीवरही कारवाई केली जाणार आहे. भविष्यात अशा घटनेची पुनरावृत्ती होणार नाही यादृष्टीने कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी पोलिस प्रशासनाला दिले आहेत. दरम्यान, पूर्ववैमनस्यातून गोळीबाराची घटना घडली आहे. ती घटना दुर्दैवी आहे. मात्र, त्याबाबत गृहमंत्र्यांचा राजीनामा मागणे अथवा राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी करणे योग्य नसल्याचे पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.