कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीत सर्वच पक्ष स्वबळावर लढणार, असतील तर शिवसेना का गप्प बसेल, शिवसेना ही स्वबळावर लढण्यास तयार असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. गांधी मैदान येथे मल्टी स्पोर्टस टर्फ उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, नगरसेविका तेजस्विनी इंगवले उपस्तित होते.
मंत्री सामंत म्हणाले, महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मैदानाच्या उदघाट्नाच्या निमित्ताने प्रचाराचाच प्रारंभ झाला, असे म्हणायला काही हरकत नाही आहे. शिवसैनिकांची पाठिंब्यावरच महानगरपालिकेवर भगवा फडकविणार आहे. कोणताही पक्ष शिवसेनेला सोबत घेतल्याशिवाय सत्ता स्थापन करू शकत नाही आहे. या वेळेला आमचीपण ताकत दिसणार आहे. सर्व 81 प्रभागात शिवसेनेचे उमेदवार विजयी होतील. श्री. क्षीरसागर यांनी यांच्या विशेष प्रयत्नातून शहरात पाच ठिकाणी मल्टी स्पोर्टस टर्फ क्रीडांगणे उभारल्याची माहिती दिली. त्यातीलच गांधी मैदान, शिवाजी पेठ या क्रीडांगणाचे काम पूर्ण झाले असून, हे मैदान खेळाडूंसाठी उपलब्ध झाले आहे. यासाठी 86 लाख निधी दिला आहे.शहरप्रमुख श्री.इंगवले यांनी खेळाडूंच्या हितासाठी आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने हे टर्फ उभारल्याचे सांगितले. यावेळी ऋतुराज क्षीरसागर, तुकाराम साळोखे, रणजीत जाधव, धनाजी दळवी, सुनील भोसले, निलेश गायकवाड, कपिल सरनाईक, पियुष चव्हाण, विश्वदीप साळोखे, योगेश चौगुले, शैलेश साळोखे, रुपेश इंगवले, प्रशांत गडकरी, सुरज साळोखे आदी उपस्थित होते.
संपादन - धनाजी सुर्वे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.