कोल्हापूर : ‘एखादा गुरू चांगल्या विचारांचा असेल आणि महाराष्ट्र धर्माच्या हितासाठी तो लढला असेल, तर अशा गुरुला गुरुदक्षिणा विचार जपून द्यायला हवी. पण, दुर्दैवाने पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी ते विचार जपले नाहीत. त्यांनी आपला पुरोगामी विचार जपला नाही. ते केवळ आपल्या स्वार्थासाठी महायुतीच्या नेत्यांसोबत गेले आहेत’, अशी टीका आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी येथे केली.
कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे घाबरले आहेत. त्यांना कदाचित दिल्लीवरून आदेश आला असावा. त्यांनी आतापर्यंत जे जे सर्व्हे केले आहेत, त्यामध्ये यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती ११५ जागांच्या पुढे जात नाही, तसेच भाजप ६० पेक्षा जास्त जागा जिंकणार नाही, असे म्हटले आहे.
महायुतीचे नेते महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेला घाबरले आहेत, अशी टीका आमदार पवार यांनी केली. राज्य सरकार निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घाईगडबडीत निर्णय घेत आहे. गायीचे खरे संगोपन शेतकरी करतात. दुष्काळाच्या काळात दुष्काळग्रस्त भागात चारा छावणी काढायला हवी होती. मात्र, पाच महिने एकही छावणी राज्य सरकारने काढली नाही. राज्य सरकार अडचणीत असताना गोमाता आठवते हे हास्यास्पद आहे, अशी टीकाही त्यांनी सरकारवर केली.
दरम्यान, आमदार पवार यांनी काल सकाळी त्यांनी करवीरनिवासिनी श्री अंबाबाई, आदमापूर येथील संतबाळूमामा मंदिरात दर्शन घेतले. शहरातील राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधिस्थळी जाऊन अभिवादन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.