Satej Patil : लोकसभेच्या तोंडावर आमदार सतेज पाटलांनी घेतली स्वाती कोरींची भेट; राजकीय चर्चांना उधाण

भाजपसोबत (BJP) न जाण्याचा जनता दलाचा निर्णय म्हणजे शिंदेंच्या विचारांना आणखी बळ मिळाले आहे.
MLA Satej Patil met Janata Dal leader Swati Kori
MLA Satej Patil met Janata Dal leader Swati Koriesakal
Updated on
Summary

येत्या निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत (Mahavikas Aghadi) आपण राहिल्यास बळ मिळेल. त्यावर कोरी यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय कळविला जाईल, अशी ग्वाही दिल्याचे सांगण्यात आले.

गडहिंग्लज : आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी काल येथील जनता दलाच्या नेत्या स्वाती कोरी (Janata Dal leader Swati Kori) यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. ताई...फक्त तुम्ही आमच्या सोबत राहा, आम्ही तुम्हाला ताकद देऊ, असे आवाहन पाटील यांनी कोरी यांना केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटील गडहिंग्लज दौऱ्यावर होते. सायंकाळी त्यांनी कोरी यांची भेट घेतली.

पाटील यांनी, आजची परिस्थिती पाहता माजी आमदार शिंदे यांच्या विचारांनेच पुढे जाण्याची गरज आहे. भाजपसोबत (BJP) न जाण्याचा जनता दलाचा निर्णय म्हणजे शिंदेंच्या विचारांना आणखी बळ मिळाले आहे. आपणाला भविष्यात राजकारणात मोठी संधी आहे.

MLA Satej Patil met Janata Dal leader Swati Kori
'शाहू महाराज तुमच्यासाठी आदर्श असतील, तर ही निवडणूक बिनविरोध करा'; सतेज पाटलांचं मुश्रीफांना प्रत्युत्तर

येत्या निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत (Mahavikas Aghadi) आपण राहिल्यास बळ मिळेल. त्यावर कोरी यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय कळविला जाईल, अशी ग्वाही दिल्याचे सांगण्यात आले. ऊर्मिलादेवी शिंदे, माजी उपनगराध्यक्ष महेश कोरी, सुनील शिंदे आदी उपस्थित होते.

MLA Satej Patil met Janata Dal leader Swati Kori
'पंतप्रधान मोदी यांच्याच नव्हे, तर कोणाच्याच वयाबद्दल बोलू नये'; संभाजीराजेंच्या टीकेला महाडिकांचे प्रत्युत्तर

निवडणुका एकत्रितपणे लढण्‍याचा प्रस्ताव

यावेळी राजकीय वाटचालीचीही पाटील यांनी चर्चा केली. ग्रामपंचायत, नगरपालिकेपासून लोकसभेपर्यंतच्या सर्वच निवडणुकीत काँग्रेस व जनता दलासोबत राहून काम करू. तसेच तालुक्यात सर्व स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका एकत्रितपणे लढू, असा प्रस्ताव पाटील यांनी कोरी यांना दिल्याचे समजते. त्यावरही कोरी यांनी पक्षाच्या प्रमुखांसह कार्यकर्त्यांशी चर्चा करू, असे सांगितल्याचे कळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.