कोल्हापूर जिल्हा देशात भारी; मोबाईल आधारशी लिंक

राज्यात कोल्हापुरात पासपोर्टची संख्या सर्वाधिक असून १ लाख आठ हजार ६८ पासपोर्टधारक आहेत
Aadhar Linking
Aadhar Linkingsakal
Updated on

कोल्हापूर : अडीच लाखांवर कोल्हापूरकरांनी मोबाईल आधारकार्डला लिंक केले असून कोल्हापूर जिल्हा देशात भारी ठरला आहे. हमिदवाडा (ता. कागल) येथील शिवाजी कुंभार यांना सर्वोत्कृष्ट पोस्ट कर्मचारी म्हणून भारतात दुसरा क्रमांक मिळाला आहे. राज्यात कोल्हापुरात पासपोर्टची संख्या सर्वाधिक असून १ लाख आठ हजार ६८ पासपोर्टधारक आहेत. तारसेवेप्रमाणेच ई-सेवाही सुरु आहे.

आंतरदेशीय व टपाल बंद होत चालल्याने त्याच धर्तीवर ही सेवा आहे. मेलवर पोस्ट ऑफिसला संदेश टाकायचा व तो संदेश पोस्ट ऑफिस त्या ग्राहकापर्यंत पोहचवते, अशी ही सेवा आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक ही भारत सरकारची, भारतीय टपाल खात्यातर्फे चालविण्यात येणारी बँकिंग सेवा आहे. १ सप्टेंबर २०१८ रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही सेवा सुरू झाली. विशेषतः दुर्गम भागातील नागरिकांना सोयीस्कर, परवडणारी आणि विश्वासार्ह बँकिंग सेवा मिळावी, हाच इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक स्थापनेमागील मुख्य हेतू आहे.

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक बचत खात्यांच्या सुविधेबरोबरच पैशांचे हस्तांतरण (मनी ट्रान्सफर), शासकीय अनुदान- विद्यावेतन तसेच अन्य थेट लाभ हस्तांतरण (डी.बी.टी.), विविध प्रकारांच्या देयकांचा भरणा, आधार सुविधेद्वारा अन्य बँकेतील रक्कम काढणे (एइपीएस),निवृत्तीवेतनधारकांसाठी हयातीचा दाखला (डिजिटल लाईफ सर्टिफिकेट), ५ वर्षांच्याखालील बालकांचे नवीन आधार कार्ड काढणे, आधार कार्डाला मोबाइल क्रमांक जोडून देणे, वाहनांचा तसेच आरोग्य विमा आदी सेवा पुरवते. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेकडे ५ कोटींहून

अधिक खातेदार असून या खात्यांत ३५०० कोटींहून अधिक रक्कम जमा आहे. सर्व खातेदारांना पोस्ट ऑफिसच्या १,३६०० पेक्षा अधिक शाखा आणि १,६२००० पेक्षा अधिक प्रशिक्षित कर्मचाऱ्यांतर्फे सेवा पुरविण्यात येत आहे.

दृष्टीक्षेपात इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेची कामगिरी

  • एकूण खातेदार ३.५ लाखांहून अधिक

  • खात्यांमधील शिल्लक रक्कम रुपये २२ कोटींहून अधिक

  • २, ४८,००० पेक्षा अधिक एइपीएस व्यवहार

बँकेतील रकमेचे वितरण

  • ३,४०,००० पेक्षा अधिक विविध देयकांचा भरणा

  • २,७०६ पेक्षा अधिक हयातीचे दाखले

  • २,६७,००० पेक्षा अधिक आधार कार्डला मोबाइल क्रमांकांची जोडणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.