Kolhapur Rain Update : राधानगरी धरणातून 1100 क्युसेक पाण्याचा विसर्ग; कोल्हापुरातील 'इतके' बंधारे पाण्याखाली..

कोल्हापूर जिल्ह्यात शाहूवाडी, राधानगरी, गगनबावडा तालुक्यांत मुसळधार पाऊस सुरू आहे.
Radhanagari Dam
Radhanagari Damesakal
Updated on
Summary

धरणातील पाण्याच्या पातळीसह पंचगंगा नदीची पाणीपातळीही वाढत आहे. रात्री आठ वाजता कसबा बावडा येथील राजाराम बंधाराची (Rajaram Bandhara) १८ फूट ३ इंच पाणीपातळी राहिली.

कोल्हापूर : जिल्ह्यात शाहूवाडी, राधानगरी, गगनबावडा तालुक्यांत मुसळधार पाऊस सुरू आहे, तर इतर तालुक्यांत मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. राधानगरी धरणातील (Radhanagari Dam) ८.३६ टीएमसीपैकी २.५८ टीएमसी धरण भरले असून, धरणातून ११०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे, तर शिंगणापूरसह सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

जिल्ह्यात पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाण्याच्या पातळीसह पंचगंगा नदीची पाणीपातळीही वाढत आहे. रात्री आठ वाजता कसबा बावडा येथील राजाराम बंधाराची (Rajaram Bandhara) १८ फूट ३ इंच पाणीपातळी राहिली. आज सकाळी सात वाजल्यापासून धरणातून ११०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

Radhanagari Dam
Almatti Dam : कोल्हापुरातील 'हे' बंधारे गेले पाण्याखाली; 'हिप्परगी'चे 22 पैकी 16 दरवाजे केले बंद; 'आलमट्टी'ची काय आहे स्थिती?

पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी व तेरवाड. कासारी नदीवरील यवलूज असे सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राजाराम, शिंगणापूर आणि पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यांवर पोलिस बंदोबस्त वाढवला आहे. तसेच बॅरिकेड्‌स‌ लावून या बंधाऱ्यांवरील वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे.

कासारी नदीचे पाणी पात्राबाहेर

माजगाव : पन्हाळा व शाहूवाडी तालुक्यातील कासारी नदी पाणलोट क्षेत्रात दोन दिवस पडणाऱ्या दमदार पावसामुळे कासारी नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून यंदा प्रथमच कासारीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. नदीवरील सर्वच बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद आहे. पर्यायी मार्गावरून वाहतूक सुरू आहे.

Radhanagari Dam
पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! तुंगारेश्वर अभयारण्यात जाणार असाल, तर थांबा; पर्यटनाबाबत वन अधिकाऱ्यांनी घेतलाय 'हा' निर्णय

यंदा मॉन्सूनचे वेळेत आगमन झाले. जूनमध्ये पावसाची उघडझाप राहिली. मात्र, दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला. या परिसरात रविवारी व सोमवारी पावसाची संततधार सुरु होती. परिणामी ओढे, नाले, विहिरी तुडुंब भरून वाहू लागले आहेत. कासारीचे पाणी यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच पात्राबाहेर पडले आहे. नदीकाठावरील सखल भागातील ऊस तसेच गवताची कुरणे पाण्याखाली गेली आहेत. काही ठिकाणी ग्रामस्थांनी जाळे लावून मासेमारी सुरु केली आहे.

आंबा, विशाळगड भागात संततधार

आंबा : विशाळगड व आंबा भागात पावसाची संततधार सुरू आहे. आंबा, मानोली परिसरासह गजापूर, विशाळगड, परळे निनाई या भागात दमदार पाऊस पडत आहे. पश्चिमेकडील कडवी मध्यम प्रकल्प व मानोली लघु पाटबंधारे प्रकल्पात पावसाची संततधार सुरू आहे. धरणांसह कडवी व शाळी नदीपात्रात पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे. आंबा, चांदोली, करूंगळे, आळतूर, कडवे, परळे निनाई या भागात भात रोप लावणीचे काम सुरू झाले आहे. दरम्यान, पश्चिमेकडील भागात विजेचा लपंडाव सुरू आहे. चांदोली परिसरात दिवसभर वीजपुरवठा बंद राहत असल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

जिल्ह्यातील धरणांमधील सध्याचा पाणीसाठा (टीएमसीमध्ये)

राधानगरी २.५४ , तुळशी १.३३ , वारणा ११.८५ , दूधगंगा ४.५३ , कासारी ०.९२, कडवी १.२८, कुंभी ०.९२, पाटगाव १.६१, चिकोत्रा ०.५१, चित्री ०.५६, जंगमहट्टी ०.४९ , घटप्रभा १.४३ , जांबरे ०.५४, आंबेआहोळ ०.८९ , सर्फनाला ०.०३, कोदे लघु प्रकल्प ०.०८ इतका पाणीसाठा आहे.

बंधाऱ्यांची पाणीपातळी

पंचगंगा नदी (राजाराम बंधारा) १८ फूट, सुर्वे १९.५ फूट, रुई ४५ फूट, इचलकरंजी ४३.२ फूट, तेरवाड ३९.९ फूट, शिरोळ ३१ फूट, नृसिंहवाडी २४ फूट, राजापूर १३.६ फूट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.