ग्रामीण भागातील डोंगर पठारावर रानभाज्यांचा मोठा खजिना आहे. या सर्व रानभाज्या औषधी गुणधर्माच्या आहेत. त्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत.
जोतिबा डोंगर : गणेशोत्सव (Ganeshotsav) सुरू झाला आहे. या काळात घरोघरी गणपतीला नैवेद्य म्हणून डोंगर पठारावर उपलब्ध असणाऱ्या रानभाज्यांचा वापर करायलाच हवा. तसेच अनेक तरुण मंडळांकडून महाप्रसाद वाटप गावोगावी, शहरात केले जाते. त्यांनी एखादी रानभाजी (Wild Vegetables) तयार करून पंगतीला वाढली तर ती आरोग्यादायी ठरू शकते.