'कृष्णात माझं बाळ, आहे थोराच्या संगतीचं'; 'रिंगाण'च्या यशानंतर कादंबरीकाराच्या आईनं व्यक्त केली भावना

कृष्णात म्हणजे साक्षात सरस्वतीचं देणं आहे. गावातील एका नाटकाच्या पात्राने त्यांना लेखनाची आवड निर्माण केली.
Krishnat Khot Ringan Novel Won Sahitya Akademi Award
Krishnat Khot Ringan Novel Won Sahitya Akademi Awardesakal
Updated on
Summary

अवघ्या शंभर-सव्वाशे घरांचं गाव छोटं; पण याच गावाने कथा, कादंबऱ्या देणारा लेखक प्रा. कृष्णात खोत यांच्या रूपाने दिला.

बोरपाडळे : ‘बाळा जरासं बरं झालं, येड मानाचं वाढ आलं, पाळी लावी त्या पारावरी, कोण सोन्याच्या बंदुकीचा, कृष्णात माझं बाळ, हाया थोराच्या संगतीचा...’ हे कौतुकास्पद शब्द आहेत ‘रिंगाण’ (Ringan Novel) साहित्यकृतीला पुरस्कार जाहीर झालेल्या कृष्णात खोत (Krishnat Khot) यांच्या आईचे. पुरस्कार (Sahitya Akademi Award) मिळाल्यानंतर त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना भावना व्यक्त केल्या.

Krishnat Khot Ringan Novel Won Sahitya Akademi Award
कोकणात 'अणुऊर्जा, रिफायनरी'ला विरोध असताना माशेलकरांचं महत्त्वाचं भाष्य; म्हणाले, सरकारनं माझ्यावर जबाबदारी टाकली तर..

त्या म्हणाल्या, ‘कष्टातनं शिक्षण घेतलं.. अजूनही गावाकडे तो आला की शेतात राबतो. गावासह माणसांशीही त्याने नाळ जोडलेली आहे. डोंगरकपारीचं, दुर्गम; पण टुमदार गाव निकमवाडी. अवघ्या शंभर-सव्वाशे घरांचं गाव छोटं; पण याच गावाने कथा, कादंबऱ्या देणारा लेखक प्रा. कृष्णात खोत यांच्या रूपाने दिला. येथे प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत कार्यालयासमोर गेले की त्यांचे साधे-कौलारू घर लागते. दोन भाऊ, दोन बहिणी, भावांची मुले असा त्यांचा परिवार गावातच राहतो.

कृष्णातचे पहिली ते सातवी प्राथमिक शिक्षण गावात झाले. दहावीपर्यंत माध्यमिक शिक्षण काट्याकुट्यातून चालत पन्हाळा येथे पायी चालत पूर्ण केले, असे मित्र राजू खोत यांनी सांगितले. साहितय अकादमीसारखा मोठा पुरस्कार मिळाल्याचे समजताच घरात अन् गावातही आनंदी वातावरण आहे. गावात फिरताना आपल्या माणसाला मोठा पुरस्कार मिळाल्याचे समाधान प्रत्येक ग्रामस्थाच्या चेहऱ्यावर दिसत होते.

Krishnat Khot Ringan Novel Won Sahitya Akademi Award
शिवराज्याभिषेक ही महाराष्ट्राच्या इतिहासातील तेजस्वी घटना; ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचं मत

कृष्णात म्हणजे साक्षात सरस्वतीचं देणं आहे. गावातील एका नाटकाच्या पात्राने त्यांना लेखनाची आवड निर्माण केली. लेखनाबरोबरच लेझीम खेळणे, हलगी वाजवणे, विटीदांडू खेळणे आदी खेळही त्यांना आवडायचे. बैल, शेती आणि खेळाची त्यांना खूप आवड आहे.

-बंडोपंत खोत, थोरले बंधू

Krishnat Khot Ringan Novel Won Sahitya Akademi Award
अभिमानास्पद! कोल्हापुरातील प्रसिद्ध कादंबरीकार कृष्णात खोत यांच्या 'रिंगाण'ला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर

पुरस्कार मिळाल्याचे समजताच ऊर भरून आला. आपल्या भावाने गावाचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं महाराष्ट्राबरोबर देशात नाव गाजवल्याचा अभिमान आहे.

-प्रकाश खोत, बंधू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.