सख्ख्या भावांचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी अंत; मुलांच्या रक्षाविसर्जना दिवशीच आईनंही सोडला प्राण, बाप पूर्णत: उद्ध्वस्त

मुलांच्या मृत्यूनंतर लगेचंच तिसऱ्या दिवशी आईचा (Mother) मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Kolhapur News
Kolhapur Newsesakal
Updated on
Summary

अचानकपणे घडलेल्या दुर्दैवी अपघाताने दोन्ही मुलं व कुटुंबाचा गाडा चालवणारी पत्नी गेल्याने कृष्णा पाटील मात्र पुरते हादरून गेले आहेत.

शाहूवाडी : सुहास आणि स्वप्नील या पोटच्या व कर्त्या दोन्ही मुलांच्या अपघाती मृत्यूचा धक्का (Electric Shock) सहन न झाल्याने मुलांच्या रक्षाविसर्जना दिवशी म्हणजे, आज कोपार्डे (ता. शाहूवाडी) येथील नंदाताई कृष्णा पाटील (वय ६०) यांचा मृत्यू झाला. दोन्ही मुलं आणि आईच्या मृत्यूने पाटील कुटुंब पूर्णतः उद्ध्वस्त झाले आहे.

मुलांच्या रक्षाविसर्जना दिवशीच आईचाही मृत्यू

मुलांच्या मृत्यूनंतर लगेचंच तिसऱ्या दिवशी आईचा (Mother) मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. बुधवारी ३ जुलै रोजी दुपारी शेतातील भात पिकास तणनाशक व खत (Fertilizer) घालण्यासाठी गेलेल्या सुहास व स्वप्नील पाटील या दोन सख्या भावांचा वीज खांबाच्या आधार तारेत उतरलेल्या विद्युत प्रवाहाचा धक्का बसून मृत्यू झाला होता.

Kolhapur News
शेतात खत घालायला गेलेल्या सख्ख्या भावांचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी अंत; पाटील कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

दोन्ही मुलांच्या मृत्यूने आईला हृदयविकाराचा झटका

दोन्ही कर्त्या मुलांचा असा अचानकपणे अपघाती मृत्यू झाल्याने आई नंदाताईस मोठा धक्का बसला होता. आपली मुलं गेलेली नाहीत, ती परत येणार आहेत असं ती सतत म्हणत होती. मोठा मानसिक धक्का बसल्याने दुसऱ्या दिवसापासून तर तिचं रडणंही बंद झालं होतं. अन्नपाणी जातं नव्हतं. पती, सून व नातेवाइकांनी नंदाताईस आधार देत खूप समजावण्याचा प्रयत्न केला; पण ती या धक्क्यातून सावरली नाही. शनिवारी रात्री उशिरा अकराच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यावेळी नातेवाइकांनी त्यांना मलकापूरच्या ग्रामीण दवाखान्यात नेलं.

'सगळाच आधार तुटला..'

मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हे ऐकूण नातेवाइकांसह सर्वांनाच धक्का बसला. सुहास, स्वप्नील व आई नंदाताईच्या मृत्यूनंतर आता त्यांच्या पश्चात पती, सून व एक वर्षांची नातं (माही) असा परिवार राहिला आहे. अचानकपणे घडलेल्या दुर्दैवी अपघाताने दोन्ही मुलं व कुटुंबाचा गाडा चालवणारी पत्नी गेल्याने कृष्णा पाटील मात्र पुरते हादरून गेले आहेत. सगळाच आधार तुटला, अशी भावना त्यांच्याकडून व्यक्त होतं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.