तलवार नको, अभ्यास करू : संभाजीराजेंचे आवाहन

तलवार नको, अभ्यास करू : संभाजीराजेंचे आवाहन
Updated on

कोल्हापूर : हि वेळ एक-मेकांवर ताशेरे ओढण्याची नसून सर्वानी एकत्र येऊन लढण्याची आहे. जर आरक्षण (Maratha Reservation) मान्य नाही झाले तर मात्र वेगळी दिशा ठरवावी लागेल असे सूचक वक्तव्य खासदार संभाजीराजे छत्रपती (mp sambhajiraje chhatrapati)यांनी सकल मराठा शोर्यपीठाच्या राज्यव्यापी एल्गार जन आंदोलनाला संबोधित करताना केले. (mp-sambhajiraje-chhatrapati-speech-in-Meeting-maratha-reservation-kolhapur-news)

आजाद गल्ली, विठ्ठल मंदिर परिसरामध्ये झालेल्या या बैठकीत संभाजीराजे पुढे म्हणाले कि , सर्वोच्च न्यायालयाने अहवाल नाकारल्यामुळे समाज अस्वस्थ आहे. राज्य सरकार असुदे अथवा केंद्र सरकार त्यांचे समाजाशी देणे घेणे नाही आहे. या मुळे संपूर्ण अभ्यास करूनच प्रयत्न करणे गरजेचे आहे. या साठीच राज्यभर दौरा करून महाराष्ट्रभरातील मराठा समाजाशी चर्चा करत आहे. या नंतर मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते यांच्याशी चर्चा करणार आहे. यातून येणाऱ्या निष्कर्षा नंतर २७ अथवा २८ मे रोजी पत्रकार परिषद घेऊन पुढील दिशा जाहीर करत असल्याचे या वेळी सांगितले. तो पर्यंत तलवार नको, अभ्यास करू. सध्या कोरोनाचे संकट असल्याने काळजी घेऊ असे देखील त्यांनी या वेळी सांगितले.

यावेळी मराठा आरक्षण लढ्यांचा आढावा घेऊन संतप्त भावना सकल मराठा समन्वयक प्रसाद जाधव यांनी व्यक्त केल्या.यावेळी राजू जाधव,अजित पवार,सरिता पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या याप्रसंगी प्रकाश सरनाईक,महादेव आयरेकर,संजय साडविलकर, चंद्रकांत चिले, शिवाजीराव लोंढ्ये, दादासाहेब देसाई, राजेंद्र थोरावडे,दिपक खांडेकर, आकाश शेलार,संजय जाधव,किशोर घाडगे, फत्तेसिंह सांवत, गिरीश जाधव,अख्तर इनामदार, पप्पू शेख,सनी शिंदे, अनिकेत बिराडे,सुशांत बोरगे, अवधूत दळवी,कपिल काकडे रियाज कागदी व कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.