'कुटुंबाला यातना देणाऱ्यांच्या दारात ते लाचारासारखे जाऊन बसले, हा कागलचा इतिहास नाही'; पवारांचा मुश्रीफांवर थेट वार

Sharad Pawar vs Hasan Mushrif : ऐतिहासिक गैबी चौकात त्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर नाव न घेता हल्लाबोल केला.
Sharad Pawar vs Hasan Mushrif
Sharad Pawar vs Hasan Mushrifesakal
Updated on
Summary

या गैबी चौकात अनेक सभा घेतल्या, हजारो लोकांना संबोधित केले; पण आजच्या सभेला नजर जाईल तिकडे माणसंच-माणसं दिसत आहेत.

कागल : ‘कागल तालुक्यातील एका व्यक्तीला आम्ही प्रोत्साहित केले. तुम्ही त्यांना सत्ता आणि सगळं काही दिलं; पण संकटावेळी साथ द्यायची जबाबदारी असताना पैसा आणि सत्तेसाठी लाचारी स्वीकारत आमचे काही जुने सहकारी आमची साथ सोडून गेले. कागलकर बाकी काही सहन करेल; पण उभ्या आयुष्यात लाचारी स्वीकारणार नाही. त्यामुळे सत्तेसाठी अशी लाचारी स्वीकारणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा,’ असे आवाहन ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी येथे केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.