कोल्हापुरकरांना दिलासा! जिल्ह्यातील म्युकरमायकोसीस नियंत्रणात

१७३ व्यक्ती झाल्या म्युकरमुक्त; १९ रुग्णांवर उपचार, अनेक शस्त्रक्रिया यशस्वी
mucormycosis
mucormycosise sakal
Updated on

कोल्हापूर : तीन महिन्यांपूर्वी आलेल्या म्युकरमायकोसिस आजाराने (mucor mycosis patients) धडकी भरवली होती. जिल्ह्यात मर्यादित उपचारांमुळे पेच निर्माण झाला आहे, अशा स्थितीत सीपीआर रुग्णालयात म्युकरसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केला. येथे प्रभावी उपचार होऊ लागले. दिवसात आठ नवे रुग्ण दाखल होत होते. (kolhapur district) हे प्रमाण सध्‍या एक - दोन रुग्णांवर खाली आले. सध्या जिल्ह्यातील म्युकरमायकोसीस पूर्ण नियंत्रणात आला आहे.

म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार आहे. ज्यांना कोरोना होऊन गेला तसेच ज्यांना तीव्र मधुमेह किंवा अन्य गंभीर आजार आहेत. अशांना म्युकरमायकोसिसचा धोका होता. जवळपास २५१ म्युकरमायकोसीसचे रुग्ण सीपीआरमध्ये (CPR) दाखल झाले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या. काहीजण औषधे, उपचारातून बरे झाले. अशा १७३ व्यक्ती म्युकरमुक्त झाल्या आहेत.

mucormycosis
उसाच्या फडात आढळला महिलेचा मृतदेह; कोळीगुड येथील घटना

अनेकांनी सुरवातीला लक्षणे अंगावर काढली, काहीची व्यसनाधिनता होती. मधुमेह टोकाला गेला होता तर काहींना फुफ्‍फुसाचा संसर्ग होता. अशा व्याधीग्रस्त ६० व्यक्तींचे मृत्यू झाले; तर सध्‍या एकूण १९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील १६ व्यक्तींवर या यशस्वी उपचार झाल्याने त्याची प्रकृती सुधारत आहे. रोज सरासरी चार व्यक्तीं म्युकरमुक्त होत आहेत. सीपीआर रुग्णालयात डॉ. वासंती पाटील, डॉ. मिलिंद सामानगडकर व भूलतज्‍ज्ञ डॉ. उल्हास मिसाळ यांच्या पुढाकाराने शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत.

mucormycosis
... अन् जलसंपदा मंत्री झाले भावुक

‘‘म्युकरचे रुग्ण वाढणे हे जवळपास थांबले आहे. कोरोना सुरू होण्यापूर्वीही म्युकर मायकोसिसचे रुग्ण होते. त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया होत होत्या. तेही बरे होत होते. मात्र तीन महिन्यांपूर्वी अचानक म्युकर रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. त्यातून म्युकर विषयीची भीती वाढली मात्र बहुतांशी रुग्ण वेळीच तपासणी व उपचाराला आले ते बरे झाले, त्यामुळे म्युकर सध्‍या नियंत्रणात आहे.’’

- डॉ. अजित लोकरे, नाक, कान, घसा विभागप्रमुख, सीपीआर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.