मुख्यमंत्र्यांचा आदेश डावलणाऱ्यांना सोडणार नाही; शिवसैनिक आक्रमक

Muralidhar Jadhav
Muralidhar Jadhavsakal
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) शासन नियुक्त संचालकपदी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची नियुक्ती झाली; पण त्यांना कामकाजात सहभागी करून घेत नसल्याच्या निषेधार्थ जाधव यांच्यासह आक्रमक शिवसैनिकांनी काल ‘गोकुळ’च्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. घोषणाबाजी करीत कार्यकर्ते कार्यालयात पोचले. मुख्यमंत्र्यांचा आदेश डावलणाऱ्यांना सोडणार नाही, संचालक मंडळाच्या मगील बैठकीत नोंद करून नियुक्ती करावी. त्याशिवाय येथून हलणार नाही, असा पवित्रा जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी घेतल्याने वातावरण तणावपूर्ण बनले.

दरम्यान, जाधव यांच्या नियुक्तीबाबत ३१ ऑगस्टच्या बैठकीत निर्णय घेण्याचे लेखी आश्‍वासन कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांनी दिल्यानंतर कार्यकर्ते शांत झाले. ३१ ऑगस्टला निर्णय न झाल्यास ७ सप्टेंबरला जिल्ह्यातील दूध संघात पोचू दिले जाणार नाही, असा इशारा जाधव यांनी दिला.

‘कोण आला रे कोण आला..., कोण म्हणतंय देत नाही..., जय भवानी जय शिवाजी’, अशा घोषणा देतच जाधव यांच्यासह कार्यकर्ते संघाच्या गोकुळ शिरगाव येथील कार्यालयात घुसले. अधिकारी डी. के. पाटील, बोर्ड सचिव एस. एम. पाटील यांनी स्वागत केले. शिवसेनेच्या मधुकर पाटील, महादेव गौड यांनी आक्रमक पवित्रा घेत ‘एम. डी.’ कोठे आहेत? त्यांना बोलवा, असे सांगितले. मात्र, घाणेकर येत नसल्यामुळे कार्यकर्त्यांनी थेट गोकुळचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्याचा इशारा दिला. त्यानंतर पंधरा-वीस मिनिटांनी घाणेकर तेथे आले. आनंद शेट्टी, बाजीराव पाटील, बाबासो पाटील, दत्ता पोवार, शिवाजी पाटील, बाबासाहेब सावगावे, सयाजी चव्हाण, अमोल देशपांडे, संदीप पाटील, संदीप दबडे, बाळासाहेब मुधाळे, अण्णा साहेब बिल्लोरे, राजेंद्र पाटील, अर्जुन जाधव यांच्या सह्यांचे निवेदन घाणेकर यांना दिले.

Muralidhar Jadhav
पोलिस, गुंडांच्या बळावर सरकार चालतंय; चंद्रकांत पाटलांचा घणाघात

कागलमध्ये भगवा फडकवणार

एकदाच घुसणार, कागलमध्ये भगवा फडकविणार, अशी घोषणाही कार्यकर्त्यांनी केली. कसली तांत्रिक अडचण आहे आम्हालाही कळते. केंद्रीय मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी सोडले नाही, दोन मंत्री काय आहेत, असा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला. यावेळी एका कार्यकर्त्याने ‘साहेब एवढं गोड बोलताय, तर पत्र का मीटिंगमध्ये ठेवले नाही’ असे घाणेकर यांना म्हणताच एकच हशा पिकला.

‘गोकुळ’ पाकिस्तानात आहे का ?

कोल्हापुतील दोन मांत्रिकांमुळे मयूर दूध संघ संपला आहे. आता हा (गोकुळ) संघ टिकायचा असला, तर शिवसेना तेथे पाहिजे. शिवसेनेशी गद्दारी खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही यावेळी दिला. तुम्हाला शासन नियुक्त संचालक नेमण्याचे पत्र मिळाले आहे की नाही ? गोकुळ पाकिस्तानात आहे का? अशा प्रश्‍नांची सरबती जाधव यांनी अधिकाऱ्यांवर केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.