Kolhapur Crime : कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या सांगलीच्या तरुणाचा कोल्हापुरात खून; डोक्यात धारदार शस्त्राने सपासप वार

गोटखिंडी (ता. वाळवा, जि. सांगली) येथील एका तरुणाचा खून करून मृतदेह बुधवारी रात्री टाकण्यात आला आहे.
Kolhapur Crime News
Kolhapur Crime Newsesakal
Updated on
Summary

सध्या तो कायद्याची पदवी शिक्षणासाठी कोल्हापूर येथे होता. त्याचे वडील प्रयोगशील शेतकरी आहेत.

सिद्धनेर्ली : कागल-निढोरी राज्य मार्गावर बामणी हद्दीतील शेतात काल सकाळी गोटखिंडी (ता. वाळवा, जि. सांगली) येथील एका तरुणाचा खून करून मृतदेह बुधवारी रात्री टाकण्यात आला आहे. या तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केलेल्या खुणा आहेत.

तरुणास इतर ठिकाणी मारून येथे मृतदेह आणून टाकल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. येथील पोलिसपाटील महादेव कुंभार यांनी काल सकाळी याबाबतची वर्दी कागल पोलिसांना दिली. त्यानंतर कागल पोलिस घटनास्थळी आले. पंचनामा करताना तरुणाच्या खिशात ड्रायव्हिंग लायसन्स सापडले. त्यावरून त्याचे नाव अमरसिंह दत्ताजीराव थोरात (वय ३०, रा. गोटखिंडी ता. वाळवा) असल्याचे समजले.

Kolhapur Crime News
Shivaji University : पेपरफुटी प्रकरणात विद्यापीठाकडून गंभीर दखल; अहवाल, सीसीटीव्ही फुटेज मागविले

कोल्हापूर येथील एका कॉलेजमध्ये तो शिकत असल्याचे समजते. दरम्यान, रात्री साडेनऊच्या सुमारास या ठिकाणी एक चार चाकी गाडी थांबल्याचे काही नागरिकांनी पाहिले होते. त्यामुळे याचवेळी हा मृतदेह या गाडीतून शेतात टाकला असण्याची शक्यता आहे. अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, उपविभागीय अधिकारी संकेत गोसावी, निरीक्षक अरविंद काळे, उपनिरीक्षक आर. डी. गच्चे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी व पंचनामा केला.

गोटखिंडीत शोककळा

बावची ः गोटखिंडी (ता. वाळवा) येथील अमरसिंह थोरात (वय ३०) या तरुणाच्या खुनाची माहिती समजताच गोटखिंडी गावावर शोककळा पसरली. थोरात कुटुंबीय गावात प्रतिष्ठित आहे. अमरसिंह हुशार विद्यार्थी होता. तो काही काळ पुण्यात स्पर्धा परीक्षा तयारी करीत होता.

Kolhapur Crime News
Alibaug Police : तंबाखू खाणाऱ्यांची आता गय नाही! प्रशासनानं सुरु केली कारवाई, 'इतक्या' जणांविरोधात गुन्हा

सध्या तो कायद्याची पदवी शिक्षणासाठी कोल्हापूर येथे होता. त्याचे वडील प्रयोगशील शेतकरी आहेत, तर आजोबा माजी सरपंच होते. त्याच्या मागे आई-वडील व भाऊ असा परिवार आहे. घटनेची माहिती समजताच गावात शोककळा पसरली. कुटुंबीयांनी कोल्हापूरकडे धाव घेतली. शवविच्छेदनानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास गोटखिंडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()