तबलीग जमातीचे 'ते' २१ मुस्लिम बांधव अद्याप दिल्लीतच ; एकालाही कोरोनाची लागण नाही ​

The Muslim of the Tablig tribe is still in Delhi kolhapur marathi news
The Muslim of the Tablig tribe is still in Delhi kolhapur marathi news
Updated on

कोल्हापुर : तबलीग जमातीतून दिल्लीला गेलेले कोल्हापुरातील 'ते' २१ बांधव दिल्ली मध्येच आहेत.ते कोल्हापुरात आलेलेच नाहीत .लॉक डाउन मागे घेतल्यानंतरच हे बांधव कोल्हापुरात येणार आहेत.यापैकी कोणालाही कोरोना ची लागण झालेली नाही .हे सर्व जण आरोग्य दृष्टया तंदुरुस्त असल्याचे  स्पष्टीकरण मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी भाई आजरेकर यानी दिले आहे.

 काही वृत्त वाहिन्यांनी दिल्लीत तबलीग जमातीत गेलेले कोल्हापुरातील २१ बांधव कोल्हापुरात आल्याने कोल्हापुरात कोरोना चा संसर्ग वाढला अशा आशयाच्या बातम्या दिल्या आहेत.यात कोणत्याही प्रकारचे तथ्य नसल्याचे आजरेकर यानी स्पष्ट केले 

.मुस्लिम बोर्डिंग चे चेअरमन गनिभाई आजरेकर यांचे स्पष्टीकरण​


 ते म्हणाले,"  तबलीग जमातीसाठी जाणारे मुस्लिम बांधव धर्म प्रसार करत नाहीत , तर धर्माचे आचरण काटेकोर पणे कसे करावे , हे शिकण्या साठी तबलीग जमातीत जातात.आतापर्यंत हजारो लोकांना व्यसनापासून परावृत्त करण्याचे कार्य तबलीग च्या माध्यमातून घडले आहे तीन दिवस, आठ दिवस, दहा, पंधरा ,तीस, चाळीस दिवस, चार महीने अशा कालावधी साठी ही जमात असते .दीर्घ कालावधी साठी जी जमात दिल्ली मरकज मध्ये जाते , ती मरकज मुस्लिम बाँधवांची देशातील शिखर संस्था आहे. या मर्कजचे प्रमुख मौलाना साद यांच्याशी हस्तांदोलन करून मुस्लिम बांधव आपापल्या गावी परत जातात.या मर्कज मध्ये दररोज1500 मुस्लिम बांधव येतात.अशाच पद्धति ने कोल्हापुरातील २१ मुस्लिम बांधव तबलीग साठी दिल्लीला गेले आहेत.पण त्यांचा परतीचा प्रवास सुरु होन्या पूर्वीच देशात लॉक डाऊन ची घोषणा झाली. 

एकालाही कोरोनाची लागण नाही ​

यावेळी दिल्ली मर्कज मध्ये सुमारे 1500  मुस्लिम बांधव होते. कोरोना संसर्गाच्या भीतीने या सर्वाना एकत्र ठेवणे ही धोकादायक होते ,आणि लॉक डाऊन मुळे हे लोक आपापल्या गावी परत जाणे ही शक्य नव्हते.यासंदर्भात दिल्ली मर्कजच्या मुफ्तीनी दिल्ली सरकार आणि आरोग्य मंत्रालयाशी चर्चा करून तोडगा काढला .त्यानुसार दिल्ली राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने या सर्व तबलीगी बांधवांची आरोग्य तपासणी करून दिल्लीपासुन ४० किलोमीटर अंतरावर एका बहुमंजली अपार्टमेंट मध्ये एका खोलीत फक्त दोघे अशा पद्धतिने सर्वाना क्वारन्टांईन केले आहे.त्याना सरकार तर्फे जेवण उपलब्ध करून देण्यात येत आहे. .यामध्येच कोल्हापुरच्या २१ तबलीगी बांधवांचा ही समावेश आहे.यापैकी कोणीही कोरोनाग्रस्त नाही.

वस्तुस्थिती जाणून घेऊन वस्तुनिष्ठ वृत्तांकन करावे

लॉक डाऊन ची मुदत संपल्यानंतरच हे लोक कोल्हापुरात आणले जाणार आहेत.त्यानंतर कोल्हापुरात पुन्हा त्यांची वैद्यकीय तपासणी करून पुन्हा त्याना चौदा दिवस क्वारन्टांईन करून मगच घरी सोडले जाणार आहे.कुणीही याबाबत गैसमज करून घेऊ नये.समाज स्वास्थ्य लक्षात घेऊन कोल्हापुरातील मुस्लिम बांधवानीच पुढाकार घेऊन कोरोना चा संसर्ग वाढू नये यासाठी मसजिद नमाज पठना साठी बंद केल्या आहेत. १७ आणि १८ एप्रिल रोजी गगनबावडा येथे आयोजित इज्तेमा रदद् केला.जिल्हा आणि पोलीस प्रशासनाशी मुस्लिम बांधव नेहमीच सहकार्याची भूमिका घेत आले आहेत.या पार्श्वभूमीवर माध्यमानीही वस्तुस्थिती जाणून घेऊन वस्तुनिष्ठ वृत्तांकन करावे असे आवाहन गनी आजरेकर यानी यावेळी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.