जिल्ह्यात नमो शेतकरी महासन्मान योजनेचे चार लाख ५९ हजार ३१७ लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना दोन सप्टेंबरपर्यंत चौथा आणि पाचवा हप्ता देण्यासाठी शासनाने तयारी केली आहे.
कुडित्रे : शेतकऱ्यांचा गौरी-गणपती सण गोड होणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना (Farmers) गौरी-गणपती सणाला १८३७ कोटी २७ लाख रुपये मिळणार आहेत. राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा (Namo Shetkari Mahasanman Yojana) चौथा आणि पाचवा हप्ता दोन सप्टेंबरला देण्यासाठी शासनाची तयारी सुरू आहे. जिल्ह्यातील चार लाख ५९ हजार ३१७ शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत.