Kolhapur Ambabai Temple : गरुड मंडपासमोरून भाविकांना श्री अंबाबाई देवीचे मुखदर्शन

मुख्य दर्शन मंडपाचे काम पूर्ण : मंडपामध्ये पिण्याच्या पाण्यासह फॅनची सुविधा
kolhapur Shree Ambabai Temple
kolhapur Shree Ambabai Templesakal
Updated on

कोल्हापूर : नवरात्रोत्सव दोन दिवसांवर आला असून करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील तयारी पूर्ण झाली आहे. मुख्य दर्शन मंडपाचे काम पूर्ण झाले असून, भाविकांना येथे पिण्याच्या पाण्यासह फॅनची सुविधाही उपलब्ध केली आहे. गरुड मंडपासमोरून मुखदर्शन मिळणार असून त्यासाठीची व्यवस्था आज पूर्ण झाली. दरम्यान, नवरात्रोत्सवासाठी आवश्यक साहित्य खरेदीसाठीही बाजारात गर्दी होत आहे.

गरुड मंडप दुरूस्तीसाठी बंद असल्याने यंदा रोज पालखी कुठे सजावायची, हा प्रश्न आहे. याबाबत लवकरच निर्णय होईल. मंदिरातील सांस्कृतिक कार्यक्रम दुपारनंतर घेण्याचे नियोजन सुरू असून त्याचे अंतिम वेळापत्रक उद्या (शुक्रवारी) ठरण्याची शक्यता आहे.

शेतकरी संघातील दर्शनरांगेची व्यवस्थाही अंतिम टप्प्यात असून पागा इमारतीतील कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. येथे स्वच्छतागृहांबरोबरच पर्यटन माहिती केंद्र सुरू केले जाणार आहे. दरम्यान, महापालिकेच्या वतीने मंदिराला जोडणाऱ्या सर्व मार्गांवरील अतिक्रमणे काढली असून स्वच्छतेची कामेही पूर्ण झाली आहेत.

kolhapur Shree Ambabai Temple
Kolhapur News: अंबाबाई मंदिर परिसरात मोठा राडा! मंदिर परिसरात खासगी दुकानदारांनी लावलेले चप्पलस्टँड काढण्यावरून वाद

दुर्गाज्योती नेण्यासाठी गर्दी

अंबाबाई मंदिरातून दुर्गाज्योती नेण्यासाठी नवरात्रोत्सव मंडळे येऊ लागली आहेत. त्यामुळे ‘अंबामाता की जय’, ‘दुर्गामाता की जय’ अशा जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून जात आहे. पुढील दोन दिवस ही गर्दी अधिक असेल.

तुळजाभवानी मंदिराची रंगरंगोटी

तुळजाभवानी मंदिरात स्वच्छतेबरोबरच रंगरंगोटीची कामेही पूर्ण झाली आहेत. उद्या (शुक्रवारी) नगारखान्याची स्वच्छता पूर्ण केली जाईल. त्यानंतर भवानी मंडप आणि मंदिर परिसर विद्युतरोषणाईने उजळून निघेल.

kolhapur Shree Ambabai Temple
Kolhapur : अपहृत वारांगनेची पोलिसांमुळे सुटका; थरारक पाठलाग, अपहरणकर्ते पसार

फेरीवाले, व्यापाऱ्यांची आज बैठक

अंबाबाई मंदिर परिसराला जोडणाऱ्या मार्गावरील वाहतूक उत्सव काळात बंद करू नये, अशी परिसरातील फेरीवाले, व्यापाऱ्यांची मागणी आहे. या पार्श्वभूमीवर विविध फेरीवाले व व्यापारी संघटनांची संयुक्त बैठक उद्या (शुक्रवारी) सकाळी अकरा वाजता सराफ संघाच्या कार्यालयात आहे.

गोपी महिला मंडळातर्फे विविध स्पर्धा

शाहूपुरी दुसरी गल्लीतील श्री राधाकृष्ण मंदिरातील गोपी महिला मंडळातर्फे रविवार (ता. १५) पासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे. दररोज सायंकाळी सहा ते नऊ वेळेत महिलांसाठी विविध कार्यक्रम होतील. प्रेमिलाबेन शाह, विमलाबेन पटेल, कलावती मेहता यांनी संयोजन केले आहे. उत्सवकाळात विविध स्पर्धा होणार असून अधिक माहितीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.