Navratri Festival : अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी; शिखरांसह परिसरात स्वच्छता मोहीम, दर्शनरांगेत केला बदल

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात (Ambabai Temple) स्वच्छता मोहिमेला (Cleanliness campaign) प्रारंभ झाला.
Navratri Festival 2023 Ambabai Temple Kolhapur
Navratri Festival 2023 Ambabai Temple Kolhapuresakal
Updated on
Summary

यंदा वाढवलेल्या दर्शनरांगेमुळे भाविकांना कोणताही त्रास न होता दर्शन घेता येणार आहे.

कोल्हापूर : नवरात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात (Ambabai Temple) स्वच्छता मोहिमेला (Cleanliness campaign) प्रारंभ झाला. मुंबईतील आय स्मार्ट फॅसिटिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतर्फे मंदिरातील स्वच्छतेला सुरुवात झाली.

सकाळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्या हस्ते स्वच्छता साहित्याचे पूजन करण्यात आले. यानंतर मंदिराची शिखरे, मुखदर्शनाच्या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. दरम्यान, शेतकरी संघाच्या इमारतीतही दर्शनरांग उभारण्यात आली आहे.

Navratri Festival 2023 Ambabai Temple Kolhapur
Asian Games : कष्टाचं झालं चीज! आशियाई क्रीडा स्पर्धेत आदितीचा 'सुवर्णवेध'; देदीप्यमान यशाने आई-वडील भारावले

एकावेळी साडेतीन हजार भाविक दर्शनरांगेत मावतील, अशी व्यवस्था फक्त शेतकरी संघाच्या इमारतीमध्ये करण्यात आली आहे. याशिवाय या इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर सीसीटीव्ही कंट्रोल रूम होणार आहे. जेणेकरून गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्हीद्वारे वॉच राहील. शेतकरी संघाच्या इमारतीमध्ये आपत्कालीन परिस्थितीत भाविकांना आराम करण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. त्याबरोबरच हिरकणी कक्षही उभारला आहे.

Navratri Festival 2023 Ambabai Temple Kolhapur
MPSC Exam : जिद्द असावी तर अशी! अधिकारी होऊनच सुषमानं ठेवलं गावात पाऊल; एकाचवेळी चार पदांवर मारली बाजी

दोन्ही दर्शनरांगांची क्षमता पाच हजारांवर

शेतकरी संघातील दर्शनरांग व सरलष्कर भवनजवळील दर्शनरांग अशा दोन्ही दर्शनरांगा मिळून एकावेळी सुमारे पाच ते साडेपाच हजार भाविक दर्शनासाठी थांबू शकतात. दरवर्षी नवरात्रोत्सवात गर्दी वाढल्यानंतर दर्शनरांग छत्रपती शिवाजी चौकापर्यंत पोहोचते. यंदा वाढवलेल्या दर्शनरांगेमुळे भाविकांना कोणताही त्रास न होता दर्शन घेता येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()