कॉंग्रेस-राष्ट्रवादी, सेनेचे उमेदवार ठरवणार 
असतील तर चालणार नाही

कॉंग्रेस-राष्ट्रवादी, सेनेचे उमेदवार ठरवणार असतील तर चालणार नाही

वास्तविक त्यांना शिवसेनेला नव्हे तर भाजपला सोबत घ्यायचे होते
Published on
Summary

वास्तविक त्यांना शिवसेनेला नव्हे तर भाजपला सोबत घ्यायचे होते

कोल्हापूर : जिल्हा बॅंकेत किती आणि कोणती जागा असावी हे ठरविण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. मातोश्रीवरूनच याची घोषणा होईल. पण शिवसेनेचे उमेदवार कॉंग्रेस-राष्ट्रवादीचेचे नेते ठरवत असतील हे चालणार नाही. वास्तविक त्यांना शिवसेनेला नव्हे तर भाजपला सोबत घ्यायचे होते अशी टीका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी केली. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी (केडीसीसी) बॅंकेच्या निवडणूकीनिमित्त शिवसेनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी शासकीय विश्रामगृहात पदाधिकारी, उमेदवार व कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली.

शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय पवार म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. हाच फॉर्म्युला जिल्हा बॅंकेत राहिले असे पहिल्यापासून सांगितले जात होते. पण, प्रत्यक्षात कॉंग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेला सोडून भाजपशी मिळते जुळते घेवून शिवसेनेला धोका दिला आहे. आता स्वार्थी नेते विरूध्द स्वाभिमानी शिवसेना कार्यकर्ते अशा लढाई सुरु झाली आहे. शिवसेनेच्या महिला आघाडीनेही या निवडणूकीत पुढाकार घेतला पाहिजे. यामध्ये निश्‍चितपणे आपला विजय होणार यात शंका नसल्याचा विश्‍वासही पवार यांनी व्यक्त केला.

कॉंग्रेस-राष्ट्रवादी, सेनेचे उमेदवार ठरवणार 
असतील तर चालणार नाही
काँग्रेस-भाजपची टक्कर; राष्ट्रवादीच्या एन्ट्रीने चुरशीची लढत

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील म्हणाले, जिल्ह्यात शिवसेनेला काना, विलांटी पुरतेचे वापरले जात आहे. जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीचे नियोजन आठ दिवसात करुन चालणार नाही. त्याचे सहा महिन्याआधीच नियोजन झाले पाहिजे होते. आता मोर्चा आणि आंदोलन करुन चालणार नाही. तांत्रिक बाबींवर काम केले पाहिजे. आकाराम पाटील म्हणाले, जिल्हा बॅंकेसाठी शहरातील पेठांमध्ये असणाऱ्या मतदारांपर्यंत पोचले पाहिजे. ज्या-ज्या ठिकाणी पेठ आहे, त्या-त्या ठिकाणी शिवसेनेची शाखा आहे. या शाखेतील प्रत्येक पदाधिकाऱ्याने मतदारांपर्यंत पोचले पाहिजे. त्या शिवसेनेची भूमिका सांगितली पाहिजे. राज्यात ठाकरे सरकार आहे. जिल्हा बॅंकेसाठी त्याचा चांगला उपयोग करता येईल. हे ही पटवून दिले पाहिजे.

शिवसेना जिल्हा संघटक संजय जाधव म्हणाले, महाविकास आघाडी म्हणून आम्ही गाफिल राहिलो. सहकारमध्ये आम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न केला आहे. पण आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांनी रडायला नाही तर लढायला शिकवले आहे. त्यानूसार जिल्हा बॅंकेची निवडणूक ताकदीने लढणार आहे. यावेळी, संजय पाटील, चंद्रकांत पाटील, तानाजी आंग्रे, संभाजी पाटील, संदिप कारंडे, मंजित माने, सुरेश पोवार, जीवन पाटील, इंद्रजित पाटील, सतीश कुरणे, बाजीराव पाटील, राजेंद्र पाटील, शुभांगी पवार, स्मिता सावंत, विराज पाटील, कृष्णात पोवार, प्रशांत पावोर सरदार पोवार उपस्थित होते.

कॉंग्रेस-राष्ट्रवादी, सेनेचे उमेदवार ठरवणार 
असतील तर चालणार नाही
देवराष्ट्रेतील दत्तात्रयच्या कारनाम्यावर 'महिंद्रा' फिदा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.