ना बोर्डावर नाव, ना नेत्याचा फोटो..; मुश्रीफांच्या मतदारसंघात झळकला 'साहेबप्रेमी' बॅनर, उलट-सुलट चर्चांना उधाण

गडहिंग्लज शहरात शरद पवार प्रेमींचा (Sharad Pawar) फलक लागल्याने उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.
Hasan Mushrif Vs Sharad Pawar
Hasan Mushrif Vs Sharad Pawaresakal
Updated on
Summary

केवळ राष्ट्रवादीच नव्हे तर इतर पक्षातही पवारांचे समर्थक आहेत. परंतु हा फलक नेमका कोणी लावला, याची चर्चा आहे.

गडहिंग्लज : आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या कागल मतदारसंघात समाविष्ट गडहिंग्लज शहरात शरद पवार प्रेमींचा (Sharad Pawar) फलक लागल्याने उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. कोणत्याही पक्षात फूट पडल्यानंतर पहिला बळी पडतो तो कार्यकर्त्यांचा.

Hasan Mushrif Vs Sharad Pawar
Ratnagiri : CM शिंदेंचा टेम्पो कधीही कलंडणार; खासदार राऊतांनी केलं शिंदे गटाचं टेन्शन वाढवणारं वक्तव्य

कोणत्या नेत्याला दुखवायचे या चिंतेत असणारे कार्यकर्ते अनामिक साहेबप्रेमी म्हणून डिजीटल बोर्ड लावतात. तसाच एक फलक आज शहरात झळकत आहे. परंतु अनामिक साहेबप्रेमी कोण, याविषयीची उत्सुकताही तितकीच आहे.

राष्ट्रवादीतील बंडानंतर पक्षातील कार्यकर्त्यांची बहुतांश ठिकाणी विभागणी होत आहे. गडहिंग्लजमध्ये आज दसरा चौकात एक फलक झळकला आहे. फलकावर कोणाचीच नावे नाहीत. अनेकवेळा कोणत्याही पक्षातील फूट ही कार्यकर्त्यांच्याच मुळावर उठते.

Hasan Mushrif Vs Sharad Pawar
Karnataka : दारुण पराभवानंतर आता भाजपला मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष; 'या' नावाची जोरदार चर्चा

इकडे आड आणि तिकडे विहिर, अशा स्थितीतील कार्यकर्त्यांचा अशा राजकारणात बळी जातो. तशीच अवस्था आता राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांची झाली आहे. यामुळेच कोणाचेही नाव न टाकता शुभेच्छा, पाठींब्याची फलके लावली जात आहेत.

गडहिंग्लजमधील अशाच एका फलकावर केवळ, सर्वसामान्यांचे आधारवड अशी टॅगलाईन वापरुन ‘मा. शरदचंद्रजी पवार साहेबप्रेमी’ असा मजकूर लिहला आहे. आज दिवसभर हा फलक लक्षवेधी ठरला, तसेच उलटसुलट चर्चाही सुरु आहे. गडहिंग्लज शहरासह ग्रामीण भागात शरद पवारांना मानणाऱ्‍या कार्यकर्त्यांचा एक वर्ग आहे.

Hasan Mushrif Vs Sharad Pawar
Mumbai Court : कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेताच मुश्रीफांना मोठा दिलासा; कोर्टानं अटकेबाबत घेतला महत्वाचा निर्णय

केवळ राष्ट्रवादीच नव्हे तर इतर पक्षातही पवारांचे समर्थक आहेत. परंतु हा फलक नेमका कोणी लावला, याची चर्चा असून आमदार मुश्रीफ यांच्या मतदारसंघात गडहिंग्लज शहराचा समावेश असल्याने या फलकाबाबतची अधिक उत्सुकता पहायला मिळत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.