Hasan Mushrif : मोठी बातमी! NCP नेते हसन मुश्रीफ पुन्हा अडचणीत; तीन माजी संचालकांची ED कडून चौकशी सुरू

मुश्रीफांच्या जवळ असलेल्या तीन माजी संचालकांची चौकशी सुरू आहे.
NCP leader Hasan Mushrif
NCP leader Hasan Mushrifesakal
Updated on
Summary

मागच्या 15 दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्हा बँकेसह (Kolhapur District Bank) मुश्रीफांचा हमिदवाडा इथं असणारा सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यावर छापेमारी करण्यात आली होती.

कोल्हापूर : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि त्यांच्या मुलांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मुश्रीफांच्या मुलांच्या अटकपूर्व जामिनाला ईडीनं (ED) विरोध केलाय.

नुकत्याच झालेल्या सुनावणीदरम्यान ईडीनं लेखी उत्तर सादर करत जामिनाला विरोध केला. अटकपूर्व जामीन दिल्यास तपासावर परिणाम होईल, असा युक्तिवाद ईडीनं न्यायालयात केला.

दरम्यान, आता ईडीकडून पुन्हा जिल्हा बँकेच्या तीन माजी संचालकांकडं चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. मागच्या 15 दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्हा बँकेसह (Kolhapur District Bank) मुश्रीफांचा हमिदवाडा इथं असणारा सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यावर छापेमारी करण्यात आली होती.

NCP leader Hasan Mushrif
Political News : गुलाबराव पाटील गुवाहाटीला शेण खायला गेले होते का? शेतकरी नेत्याची घणाघाती टीका

आता मुश्रीफांच्या जवळ असलेल्या तीन माजी संचालकांची चौकशी सुरू आहे. पुढच्या काळात इतरही माजी संचालकांची चौकशी होण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. आप्पासाहेब नलावडे कारखान्याला (Appasaheb Nalawade Factory) कर्जवाटप प्रकरणी ही चौकशी होत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं हसन मुश्रीफांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

NCP leader Hasan Mushrif
Nathuram Godse : भाजपला भारताला नथुराम गोडसेचा देश बनवायचाय; उपमुख्यमंत्र्यांचा घणाघाती हल्ला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.