Kolhapur : मोदींची ताकद वाढवण्यासाठी तिकडे गेले, मग शरद पवारांची ताकद का वाढवली नाही; रोहित पवारांचा मुश्रीफांना सवाल

'पुरोगामी संदेश देण्यासाठीच शरद पवार यांनी कोल्‍हापूरची निवड केली'
Rohit Pawar vs Hasan Mushrif
Rohit Pawar vs Hasan Mushrifesakal
Updated on
Summary

भाजपकडून जे फोडाफोडीचे राजकारण सुरु आहे, त्यावर उध्‍दव ठाकरे गेली वर्षभर बोलत आहेत. मात्र शरद पवार पहिल्यापासून भाजपच्या या नितीवर टीका करत आहेत.

कोल्‍हापूर : भाजपने (BJP) राज्यात पक्ष फोडले, घरे फोडली. अशा प्रवृत्तीच्या मुळावरच घाव घालणे आवश्यक असल्याचे सांगत आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपवर हल्‍लाबोल केला. राष्‍ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची शुक्रवारी (ता. २५) दसरा चौक येथे सभा होत आहे.

या सभेच्या पार्श्वभूमीवर जिल्‍हा दौऱ्या‍वर आलेल्या रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. आमदार पवार म्हणाले, ‘महाराष्ट्राला पुरोगामी विचार देणारे व ते विचार अंमलात आणणारे शहर म्‍हणून कोल्‍हापूरची ओळख आहे. ऐतिहासिक दसरा चौकातून राज्याला व देशाला पुरोगामी संदेश देण्यासाठीच शरद पवार यांनी या मैदानाची निवड केली असेल.

Rohit Pawar vs Hasan Mushrif
Rohit Pawar : शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं हे मुख्यमंत्र्यांनी अजितदादांना विचारावं; रोहित पवारांचा टोला

भाजपकडून जे फोडाफोडीचे राजकारण सुरु आहे, त्यावर उध्‍दव ठाकरे गेली वर्षभर बोलत आहेत. मात्र शरद पवार पहिल्यापासून भाजपच्या या नितीवर टीका करत आहेत. शरद पवारांना ७० पेक्षा अधिक आमदार निवडून आणता आले नसल्याचे वक्‍तव्य पुण्यातील एका नेत्यांनी केले आहे. त्याचे आश्‍‍चर्य वाटते. हेच नेते आजूबाजूला होते. त्यामुळेच कदाचित ७० पेक्षा जास्‍त आमदार निवडून आणता आले नसतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Rohit Pawar vs Hasan Mushrif
Bacchu Kadu : कोणी नाराज झालं तर त्याची मला परवा नाही, शेतकरी मरत आहे पण..; बच्चू कडूंचा कोणावर प्रहार?

पवारांची ताकद का वाढवली नाही?

‘एक मंत्री हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ताकद वाढवण्यासाठी गेल्याचे सांगत आहेत. मग शरद पवार यांची ताकद का वाढवली नाही’, असा सवाल आमदार पवार यांनी हसन मुश्रीफ यांचे नाव न घेता विचारला.

खासदार शरद पवार यांचा दौरा असा

शुक्रवारी (ता. २५) दुपारी २ वाजता सातारा येथून कोल्‍हापूरकडे प्रयाण. दुपारी साडेचार वाजता तावडे हॉटेल येथे पोहोचल्यानंतर तेथून ताराराणी चौकापर्यंत मोटरसायकल रॅलीने आगमन. हॉटेल पंचशील येथून दसरा चौक येथील सभेकडे ५ वाजून १५ मिनिटांनी प्रयाण. सभास्‍थळी ५.३० वाजता आगमन व रात्री हॉटेल पंचशील येथे मुक्‍काम.

Rohit Pawar vs Hasan Mushrif
Sangli Politics : जयंत पाटलांना मोठा धक्का! 'हे' प्रमुख पदाधिकारी अजितदादांच्या गोटात; सांगलीचं बदलणार राजकारण?

शनिवारी सकाळी साडे नऊ ते ११ या वेळेत शिष्‍टमंडळांच्या भेटीगाठी, ११ ते ११.३० या वेळेत पत्रकार परिषद, १२ वाजता शाहू महाराज समाधीस्‍थळास भेट, १ ते २ या वेळेत जिल्‍हाध्यक्ष व्‍ही. बी. पाटील यांच्या निवासस्‍थानी राखीव, ३.३० ते ५.३० हिंद मजदूर सभा अधिवेशनास उपस्‍थिती (महासैनिक दरबार हॉल) व ६ वाजता पुण्याकडे प्रयाण.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()