आजरा कारखान्यावर मुश्रीफांचाच दबदबा; 19 जागांवर विजय मिळवत सतेज पाटील-विनय कोरे आघाडीला दिलं धोबीपछाड

ऐनवेळी रिंगणात उतरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेतृत्वाखालील पॅनेलने संचालकपदाच्या २१ पैकी १९ जागा जिंकत मैदान मारले.
Ajara Sugar Factory Election
Ajara Sugar Factory Electionesakal
Updated on
Summary

स्वाभिमानी सभासदांनी कारखाना सुस्थितीत आणण्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील रवळनाथ आघाडीला भरघोस मतदान केले.

आजरा\ उत्तूर : आजरा साखर कारखान्याच्या निवडणुकीत (Ajara Sugar Factory Election) माघार घेतल्याचे जाहीर केल्यानंतर ऐनवेळी रिंगणात उतरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेतृत्वाखालील पॅनेलने संचालकपदाच्या २१ पैकी १९ जागा जिंकत मैदान मारले. काँग्रेस, भाजप व शिवसेनेच्या आघाडीला धोबीपछाड दिला. त्यांच्या चाळोबादेव शेतकरी विकास आघाडीला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले.

आजरा कारखान्यातही ‘बिद्री’ची (Bidri Factory) पुनरावृत्ती झाली. या निवडणुकीमध्ये कारखान्याच्या विद्यमान अध्यक्षांसह नऊ संचालकांना पराभवाचा धक्का बसला आहे. सभासदांनी बारा नवीन चेहऱ्यांना संधी दिली. निकालानंतर विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला.

Ajara Sugar Factory Election
Bidri Sakhar Karkhana Election : हसन मुश्रीफ, केपी पाटलांनी शाळा केली, काँग्रेसला घेऊन चंद्रकांत पाटलांना पाडलं,

अनेक अर्थांनी गाजलेल्या या निवडणुकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif), आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे, प्रकाश आबिटकर, माजी आमदार के. पी. पाटील आदी दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. सुरुवातील या नेत्यांनी ही निवडणूक बिनविरोधचा प्रयत्न केला. जागा वाटपावरून समझोता न झाल्याने राष्ट्रवादीने ऐनवेळी निवडणूक रिंगणातून माघार घेतली होती.

पण, कार्यकर्त्यांच्या दबाबामुळे राष्ट्रवादीने श्री रवळनाथ शेतकरी विकास आघाडी हे स्वतंत्र पॅनेल ऐनवेळी मैदानात आणले. त्यामुळे या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. दोन्हीही आघाड्यांमध्ये विद्यमान संचालकांचा भरणा होता. सुरुवातीला ही निवडणूक चुरशीची होईल, असे वाटत होते, पण निकालात राष्ट्रवादीने चांगलीच आघाडी घेत बाजी मारली.

या निवडणुकीसाठी रविवारी (ता. १७) चुरशीने ६१ टक्के मतदान झाले होते. येथील पंचायत समितीच्या सभागृहात सकाळी आठला मतमोजणी सुरू झाली. पहिल्या फेरीमध्ये उत्तूर विभागातून राष्ट्रवादी कॉंग्रेसने सुमारे सातशेचे मताधिक्य घेतले होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या बाजूला कल दिसून येत होता. कल लक्षात आल्यावर राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मतदान केंद्राबाहेर जमा होऊ लागले. त्यांनी जल्लोष सुरू केला. दरम्यान, पेरणोली-गवसे गटात विरोधी चाळोबादेव विकास आघाडीने काहीअंशी आघाडी घेतली. त्यामुळे निकालाबाबत कार्यकर्त्यांना हूरहूर लागून राहिली.

आजरा-श्रृंगारवाडी गटात राष्ट्रवादीने अपेक्षित मतदान घेतल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत उत्साह दाटून आला. विरोधी चाळोबादेव आघाडीचे नेते व पदाधिकाऱ्यांना भादवण-गजरगाव व हात्तीवडे-मलिग्रे गटात अपेक्षित आघाडी मिळेल, अशी खात्री होती; पण तेथेही विरोधी आघाडीला अपेक्षित मतदान झाले नाही. सुळे, किणेमध्ये राष्ट्रवादीने चांगली आघाडी घेतली. निकालाचा कल राष्ट्रवादीच्या बाजूकडे झुकत असल्याने विरोधी आघाडीचे उमेदवार व कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसू लागली.

Ajara Sugar Factory Election
कोकणात शरद पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचा तडकाफडकी राजानीमा, राजकीय चर्चांना उधाण

या दोन्ही गटांत राष्ट्रवादीला अपेक्षित मतदान झाल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. मतदान केंद्राबाहेर कार्यकर्ते गुलालात न्हाऊन गेले. फटाक्यांची आतषबाजी व हलगी-घुमक्याच्या तालावर कार्यकर्ते नाचून आनंद साजरा करत होते. राष्ट्रवादीच्या विजयाच्या घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला होता.

निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळ मावळे यांनी सायंकाळी पाच वाजता निकाल जाहीर केला. यामध्ये राष्ट्रवादीच्या उत्पादक गटासह इतर गटातलेही उमेदवार ४०० ते १००० मताधिक्याच्या फरकाने विजयी झाले. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुजयकुमार येजरे, अमित गराडे यांनी मतमोजणी प्रक्रियेला साह्य केले.

नवीन चेहरे

रणजित देसाई, दीपक देसाई, शिवाजी नांदवडेकर, गोविंद पाटील, राजेश जोशीलकर, राजेंद्र मुरकुटे, संभाजी पाटील, संभाजी रामचंद्र पाटील, रचना होलम, मनीषा देसाई, काशिनाथ तेली.

Ajara Sugar Factory Election
लोकसभेचं रणांगण अवघ्या 75 दिवसांवर; भाजपकडून 'रणनीती'ला सुरुवात, काँग्रेसचा सावध पवित्रा, कोण मारणार बाजी?

ब वर्ग प्रतिनिधी गटात फेरमतमोजणी

ब वर्ग प्रतिनिधी गटात चाळोबादेव आघाडीचे उमेदवार अशोक तर्डेकर रवळनाथ आघाडीच्या नामदेव नार्वेकर यांच्यापेक्षा चार मतांनी विजय झाले होते; मात्र नार्वेकर यांनी फेरमतमोजणी मागितली. यामध्ये अशोक तर्डेकर १४ मतांनी विजयी झाले. तर्डेकर यांची फेरमतमोजणीत १० मते वाढली.

स्वाभिमानी सभासदांनी कारखाना सुस्थितीत आणण्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील रवळनाथ आघाडीला भरघोस मतदान केले. त्यामुळे नूतन संचालक मंडळ पारदर्शी व सभासदाभिमुख कारभार करून कारखान्याला उर्जितावस्था मिळवून देतील. विजयामुळे पर्यायाने जिल्ह्याच्या सहकारात मंत्री मुश्रीफ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

-के. पी. पाटील, अध्यक्ष, बिद्री कारखाना

चिठ्ठीतून शेतकरी, कामगार हिताबाबत संदेश

मतपेटीत ११ चिठ्ठया मिळून आल्या. शेतकरी, कामगार हिताचा कारभार करावा, पाच वर्षांत कारखाना कर्जमुक्त करावा, सभासदांना साखर द्या, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. चाळोबादेवाला नि:स्वार्थी, कर्तबगार व लुडबूड न करणारे उमेदवार निवडून द्यावेत, असे गाऱ्हाणे घालण्यात आले आहे. मतपेटीत अंगाऱ्याची पुडी देखील मिळाली आहे.

प्रमुख पराभूत

विद्यमान अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे, माजी अध्यक्ष अशोक चराटी, गोकुळच्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे, जिल्हा परिषद सदस्या सुनीता रेडेकर, संचालक दशरथ अमृते, राजेंद्र सावंत, जनार्दन टोपले, मल्लिककुमार बुरुड.

Ajara Sugar Factory Election
पुन्हा लॉकडाऊन? केरळात कोरोनाचा नवीन प्रकार सापडताच 'या' राज्यात मास्कसक्ती; सरकाराने दिले महत्त्वाचे आदेश

श्री. रवळनाथ देवाने आजरा कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्याची शक्ती आणि हिंमत द्यावी. स्वर्गीय वसंतराव देसाई यांनी प्रतिकूल आणि खडतर परिस्थितीत मोठ्या कष्टाने कारखाना उभारला. हे शेतकऱ्यांच्या श्रमाचे पवित्र मंदिर आहे. या भावनेचे पावित्र्य सदैव जपू. सर्व सभासद आमच्या आघाडीवर प्रचंड विश्वास व्यक्त केला. या ऐतिहासिक विजयासाठी कार्यकर्ते, हितचिंतक आणि सभासद शेतकरी अहोरात्र राबले.

-हसन मुश्रीफ, पालकमंत्री व सत्तारूढ गटाचे नेते

कारखाना कर्जमुक्त व्हावा, सभासदांचे हित जोपासले जावे, यासाठी निवडणूक बिनविरोध व्हावी, असा आग्रह होता. त्यासाठी प्रयत्न केले; मात्र, कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर निवडणूक लढवण्याचा निर्णय घ्यावा लागला. सभासदांचा कौल मान्य आहे. यापुढेही कारखाना व सभासदांच्या हितासाठी प्रयत्नशील राहू.

-सतेज पाटील, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.