दुर्मिळ, अतिदुर्मिळ वृक्षसंपदा जतनाची गरज
कोल्हापूर : एक वृक्ष जेव्हा नष्ट होतो, तेव्हा या वृक्षांवर आधारलेली परिसंस्था, अन्नसाखळीतील काही दुवे लुप्त होतात. यासाठी हे वृक्ष तत्काळ संवर्धीत करावे लागतात. शहराचा विस्तार वाढत गेला. विकासाची कामे झाली; मात्र या नागरिकरणात काही दुर्मिळ, अतिदुर्मिळ झाडे नष्ट केली. काही दुर्मिळ झाडे तर शहर/जिल्ह्यात फक्त एक किंवा दोन उरली आहेत; तर काही झाडे पूर्णपणे नष्ट झाली. उदाहरणार्थ, कसबा बावड्यातील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजजवळ दिवी-दिवी, हुतात्मा गार्डनमधील वाडग्याचे झाड, टिपकेवाला कांचन, कुंकुंबर ट्री, पांढरा पांगेरा अशी काही झाडे नष्ट झाली आहेत. काही झाडे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. विशेषत: नागाळा पार्क, ताराबाई पार्क, टाऊनहॉल, रुईकर कॉलनी अन् पन्हाळ्यातील तबक उद्यानात काही झाडे उरली आहेत. यासाठी अशा वृक्षांची बीजे तयार करुन रोपे तयार करणे, वृक्षारोपणात असे वृक्षांची लागवड करणे, असे उपाय करावे लागणार आहेत.
दुर्मिळ, नष्ट झालेले वृक्ष
अजान वृक्ष, रत्नगुंज, वायवरना, नागकेशर, मादागास्कर बदाम, दिवी दिवी, महासप्तपर्णी, समुद्रफळ, गोरख चिंच, वाडग्याचे झाड (फकिराचं वाडगं), टिपकेवाला कांचन, पांढरी सावर, पांढरा पांगेरा, ऍल्युरिटस्, मनी मोहर, टेंभुर्णी, हनुमान फळ, तिवर, जंगली बदाम, सुरंगी, मुचकुंद, बेहडा, क्लुशियारोझिया ट्री, ब्राझील नट, अमृतफळ, लोणी फळ (बटर फ्रुट), ब्राऊनिया, बहुनिया ब्लॅकेनी, तोफगोळा (कैलासपती), सीतेचा अशोक, यांग यांग ट्री, मोठा करमळ, ऑईल पाम, सुवर्णपर्णी, क्वीन्सलॅन्ड नट, उंडी (बायो डिझेलसाठी तेल बिया), फॉसेज ट्री (कुकुंबर किंवा वरवंटा/काकडीचा वृक्ष), क्लेनवोव्हिया, पॅचिरा (अमेरिकन काटेसावर), बकुळ, ऑस्ट्रेलियन चेस्टनट, पुत्रंजिवी, लॅव्हेंडर ट्री, विलायती बेल, अमृतफळ.
शहर परिसर अन् जिल्ह्यात काही दुर्मिळ, अतिदुर्मिळ झाडे आहेत; तर काही झाडे पूर्णपणे नष्ट झाली आहेत. नष्ट होणारी वृक्षसंपदा जपणे, संरक्षण, संवर्धनासाठी महापालिकेने पाऊली उचलावीत. दुर्मिळ वृक्षांना अतिरिक्त संरक्षण देत वृक्षांना "हेरिटेज ट्री'चा दर्जा द्यावा. लोकांनीही परिसरात कोणते वृक्ष आहेत, हे समजनू घेत या वृक्षांची जोपासना करावी.
-प्रा. डॉ. मधुकर बाचुळकर, वनस्पती संशोधक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.