Kolhapur : अभियांत्रिकी विद्यार्थ्याने सुधाकरनगरमध्ये संपवले जिवन ; ग्राईंडरने कापून घेतला स्वतःचा गळा

सुधाकरनगर येथील नीरज विकास सरगडे (वय २३, बागेश्री अपार्टमेंट) याने फरशी कापण्याच्या ग्राईंडर कटरने स्वतःचा गळा चिरून घेऊन संपवले जिवन . आज रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना उघडकीस आली.
Kolhapur
Kolhapur sakal
Updated on

कोल्हापूर : सुधाकरनगर येथील नीरज विकास सरगडे (वय २३, बागेश्री अपार्टमेंट) याने फरशी कापण्याच्या ग्राईंडर कटरने स्वतःचा गळा चिरून घेऊन आत्महत्या केली. आज रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना उघडकीस आली. भविष्यातील आर्थिक अडचणीच्या नैराश्यातून त्याने हे कृत्य केल्याचे चिठ्ठीमध्ये लिहून ठेवले आहे. या घटनेची नोंद राजारामपुरी पोलिस ठाण्यात झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीरज हा आई आणि आजोबांसोबत आईच्या माहेरी बागेश्री अपार्टमेंटमध्ये राहत होता. तो अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. आज त्याची आई परगावी गेली होती. संध्याकाळी सात वाजल्यापासून त्याच्या फ्लॅटमधून ग्राईंडर कटरचा आवाज येत होता. शेजाऱ्यांनी दरवाजा ठोठावला.

मात्र, आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. अखेर काहीजणांनी इमारतीचा विद्युत पुरवठा खंडित केला. तसेच पोलिस आणि अग्निशामक दलाच्या जवानांना बोलावले. त्यांनी इमारतीच्या पाठीमागील बाजूने फ्लॅटमध्ये प्रवेश केला. तेव्हा बेडरूममध्ये नीरज रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. तसेच ग्राइंडर त्याच्या शेजारी कलांडून तसेच सुरू होते. त्यानंतर नीरजचा मृतदेह सीपीआरमध्ये नेण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. अत्यंत निर्घृणपणे स्वतःचेच जीवन संपविणाऱ्या नीरजबद्दल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Kolhapur
Kolhapur Politics : मुरलीधर जाधव आणि चंद्रदीप नरके यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

आर्थिक निराशेतून कृत्य

निरजच्या मृतदेहाजवळ त्याने इंग्रजीमधून लिहिलेली चिठ्ठी आढळून आली. त्यामध्ये आत्महत्येचे कारण लिहिले होते. भविष्यात आर्थिक अडचण जाणवणार. त्यामुळे शिक्षण, लग्न, मुलाबाळांचे पालनपोषण आपण करू शकणार नाही. या नैराश्‍‍येने त्याला ग्रासले होते, असे त्याने नमूद केले आहे.

ग्राइंडर कटर नवीन आणले

आत्महत्या करण्याचा निर्णय त्याने पूर्वीच घेतला असल्याचे दिसते. त्यामुळे त्याने नवीन ग्राइंडर कटर आणल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. रक्त इतरत्र जाऊ नये यासाठी त्यांनी आपला चेहरा फडक्याने घट्ट बांधला होता. त्याच्या मृत्यूनंतर ग्राइंडर तेथेच कलंडला आणि त्याचा आवाज येत होता. त्यामुळेच शेजाऱ्यांना शंका आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.