मौजमजेसाठी चक्क मामाचेच घर लुटले! साडेतीन लाखांचा डल्ला

मामाच्या घरावर साडेतीन लाखांचा डल्ला; बेळगावातील प्रकार
Belguam News
Belguam NewsSakal
Updated on

बेळगाव : मौजमजेसाठी अल्पवयीन भाच्यानेच मामाच्या घरातील दागिने चोरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी त्याला ताब्यात घेऊन त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. तर दागिने विक्री करण्यासाठी त्याला मदत केल्याप्रकरणी उधमबाग पोलिसांनी रविवार (ता.१५) सिद्धार्थ प्रकाश गुरव (वय १९, रा. राणाप्रताप रोड टिळकवाडी) असे याला अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीचे ७०.२५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

Summary

दागिने विक्री करण्यासाठी त्याला मदत केल्याप्रकरणी पोलिसांनी एका संशयीताला देखील अटक केली.

सुधाकर संतराम वाघमोरे (रा.प्लॉट नं.४८२ दुसरा क्रॉस राणी चनम्मा) यांनी या प्रकरणी उद्यमबाग पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली होती. फिर्यादी सुधाकर हे एका खासगी विमा कंपनीत काम करतात. ते नोकरी निमित्त मुंबईला राहतात. तर त्यांच्या चनम्मानगर येथील घरात त्यांची आई, बहीण आणि अल्पवयीन भाचा राहत होता. त्यांचा भाचा चैणीखोर होता. त्यामुळे घरात कोणाला काही समजायच्या आधी हळूहळू करून २२.२५ ग्रॅम वजनाचा गळ्यातील सोन्याचा हार, ८ ग्रॅमची सोन्याची अंगठी, १५ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, १० ग्रॅमचा नेकलेस, ७ ग्रॅमची कर्णफुले व सोन साखळी, २० ग्रॅमच्या पाटल्या, तांब्याचा हंडा चोरला होता. चोरलेले दागिने त्याने अटकेतील संशयीत सिद्धार्थकडे विक्रीसाठी दिले होते. त्याने सिद्धार्थ याने ते दागिने विक्री करून आलेले पैसे फिर्यादी सुधाकर यांच्या भाच्याला दिले होते.

Belguam News
कोल्हापूर: प्रांताधिकाऱ्यांसमोरच जोरदार राडा; शेतकरी संघटना आक्रमक

घरातील दागिने गायब झाल्याचे निदर्शनास येताच आई व बहीणने ही माहिती सुधाकर यांना दिली. त्यामुळे त्यांनी या प्रकरणी उधमबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्याचवेळी त्यांनी याबाबत आपल्या भाच्यावर संशय व्यक्त केला होता. त्यामुळे पोलिसांनी अल्पवयीन भाच्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने दागिने चोरल्याची कबुली दिली. दागिने विक्री करण्यासाठी त्याला मदत केल्याप्रकरणी पोलिसांनी वरील एका संशयीताला देखील अटक केली. त्यांच्याकडे सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीचे ७०.२५ ग्रॅम वजनाचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षक धीरज शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.