नव वर-वधू अडकले लॉकडाऊनमध्ये ; लग्नानंतर यंदा देवदर्शन नाहीच

newly married coupl traped i lockdown
newly married coupl traped i lockdown
Updated on

बेळगाव - लग्नानंतर अनेक जण देवदर्शनाला जातो. मात्र, कोरोनामुळे देवदर्शनाला जाणे अशक्‍यच बनले आहे. यामुळे नव वर-वधू लॉकडाऊन झाले असून देवदर्शनासाठी त्यांना अजून काही दिवस प्रतिक्षाच करावी लागणार आहे. 

कोरानामुळे देशभरात 24 मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. त्यानंतर देशात दोन महिने कडक लॉकडाऊन झाले. त्यानतंर लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली. मात्र, दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी निर्बंध ठेवण्यात आल्याने नव-वर वधूच्या समस्या वाढल्या आहेत. बेळगाव जिल्ह्यातून कोल्हापूर, पुणे आदी ठिाकणी देवदर्शनासाठी जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मात्र, महाराष्ट्रात ये-जा करणाऱ्यांसाठी अजून नियम व अटी असल्याने अनेक जण देवदर्शनाला गेलेच नाहीत. महाराष्ट्रातील अनेक मंदिरे अजून बंद आहेत. यामुळे देवदर्शनाला जाणे अवघड बनले आहे. 

राज्यात 4 मे नंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली. मार्च ते मे महिन्याच्या कालावधीत एकही लग्न झाले नाही. मात्र, 50 जणांच्या उपस्थितीत लग्न करण्याची परवानगी सरकारने दिल्यानंतर अनेकांनी आपली लग्ने उरकून घेतली. लग्नाच्या चार दिवसानंतर अनेक जण आपल्या कुलदैवताला देवदर्शनासाठी जातात. बेळगाव जिल्ह्यातील अनेकांचे कुलदैवत कोल्हापूरचा जोतिबा आहे. मात्र, महाराष्ट्रात जाणे बंद असल्याने अडचणी येत आहेत. बेळगावकर जोतिबा मंदिरबरोबर सौंदत्ती यल्लमा, तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची आंबाबाई, जेजुरीचा खंडोबा आदी ठिकाणी देवदर्शनाला जातात. नव वर-वधूला यंदा मात्र, अजून काही दिवस प्रतिक्षाच करावी लागणार आहे. बेळगाव शहरासह परिसरात अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत. त्या मंदिरात जाऊन अनेक जोडपे दर्शन घेत आहे. 


लॉकडाऊनमुळे यंदा लग्न उशीरा झाले. अनेक राज्याच्या सीमा व मंदिरे बंद असल्याने देवदर्शनाला गेलोच नाही. सध्या कोरोनाचा धोका आहे. यामुळे कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यानंतर देवदर्शनाला जाणार आहे. 
भरत किल्लेकर - बेळगाव 

संपादन - मतीन शेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.