निपाणीच्या राजकारणात लवकरच मोठा भूकंप? राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी घेतली जारकीहोळींची भेट, सत्तापालटाची शक्यता!

निपाणी पालिकेच्या राजकारणात मोठ्या उलथा-पालथी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Nipani Municipality Politics
Nipani Municipality Politics esakal
Updated on
Summary

सध्या राष्ट्रवादीकडे असलेल्या नगरसेवक व भाजपमधून विरोधी संपर्कात असलेल्या नगरसेवकांची मोट बांधण्याचे काम गुप्तपणे सुरू असल्याचीही चर्चा आहे.

निपाणी : येथील राष्ट्रवादी काँग्रेस गटातील (NCP) नगरसेवकांनी सोमवारी (ता. १३) जिल्हा पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाममंत्री सतीश जारकीहोळी (Satish Jarkiholi) यांची भेट घेतली. यावेळी माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार काकासाहेब पाटील (Kakasaheb Patil) हेही उपस्थित होते.

त्यामुळे निपाणी पालिकेच्या राजकारणात मोठ्या उलथा-पालथी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तशी चर्चा शहरात सुरू झाली असून ऐन दिवाळीत शहरातील राजकारणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता राजकीय गोटात चर्चेत आहे.

Nipani Municipality Politics
Raj Thackeray : ठरलं! गुहागरमधून मनसे निवडणूक लढवणार; गांधींना उमेदवारी देण्याची कार्यकर्त्यांची मागणी

प्रामुख्याने राष्ट्रवादीतील नगरसेवक हे पुन्हा मूळ काँग्रेस गटात येण्याची चर्चा सुरू झाली आहे. पुढील अडीच वर्षांच्या कालावधीसाठी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदासाठी लवकरच आरक्षण जाहीर होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ही भेट राजकीय पटलावर चर्चेत आली आहे. पहिल्या अडीच वर्षांच्या काळात निपाणी पालिकेत भाजपचे वर्चस्व होते. पुढील अडीच वर्षांसाठी आरक्षण जाहीर होत नसल्याने सध्या पालिकेवर प्रशासक आहेत. या काळातच विधानसभा निवडणूक झाली.

Nipani Municipality Politics
Nipani Municipality Politics esakal

यावेळी काँग्रेस गटात असणारे सर्व नगरसेवक राष्ट्रवादीला जाऊन मिळाले. पण विधानसभेत राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम पाटील यांचा पराभव झाला. भाजपच्या शशिकला जोल्ले यांनी हॅट्‌ट्रिक केली. काँग्रेसचे काकासाहेब पाटील यांचा पराभव झाला तरी राज्यात काँग्रेस सरकार आल्याने पक्ष पातळीवर त्यांच्या शिफारशीला विशेष महत्व आहे. अशा स्थितीत काँग्रेस सोडलेल्या नगरसेवकांसमोर त्रांगडे निर्माण झाले आहे.

Nipani Municipality Politics
Uday Samant : महाराष्ट्रातील 215 आमदारकीच्या आणि लोकसभेच्या 45 जागा आम्ही सहज जिंकू - उदय सामंत

पालिकेत भाजप सत्तेत असताना भाजपचे दोन नगरसेवक आधीच विरोधकांसोबत गेले होते. त्यानंतर विधानसभा निवडणूक काळात भाजपसोबत असणाऱ्या दोन अपक्ष नगरसेविका राष्ट्रवादीत दाखल झाल्या. तर विरोधी गटातील नगरसेविका भाजपसोबत आल्या. यामुळे मधल्या काळातील घडामोडींमुळे पालिकेतील कुणाचे किती बलाबल, याबद्दल अस्पष्टता आहे. अजूनही काही नगरसेवक एका गटातून दुसऱ्या गटात उड्या मारण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. दरम्यान नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदासाठी आरक्षण जाहीर झाल्यावर मात्र राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.

Nipani Municipality Politics
Loksabha Election : लोकसभा जिंकण्यासाठी भाजपचा मास्टर प्लॅन! 'या' खासदारांचं कापणार तिकीट, कोणाला मिळणार संधी?

निर्णय घेताना होणार फायदा

पालिकेच्या पहिल्या अडीच वर्षांच्या काळात पालिकेत भाजपची सत्ता, स्थानिक आमदार व खासदार भाजपचे, शिवाय राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता यामुळे शहर विकासासाठी निर्णय घेताना भाजप गटाला फायदा झाला. पण आता राज्यात काँग्रेस सरकार असून स्थानिक आमदार, खासदार भाजपचे आहेत. राज्यातील काँग्रेस सरकारने भाजप सरकारच्या काळातील कामांना ब्रेक लावला आहे. पालिकेत काँग्रेस गटाच्या माध्यमातून सत्ता स्थापन झाल्यास सत्ताधारी गटाला निर्णय घेणे सुलभ होणार असल्याची स्थिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.