ह्रदयद्रावक! पतीच्या स्वास्थ्यासाठीची प्रार्थना अधुरीच; घोडा दुचाकीच्या आडवा आल्याने अपघातात महिला ठार

Kolhapur Accident : शोभा शिपुरे यांनी मनापासून देवाचे आभार मानले व मुलगा ओंकारजवळ त्यांनी अंबाबाईची ओटी भरून येऊ अशी इच्छा व्यक्त केली.
Kolhapur Accident
Kolhapur Accidentesakal
Updated on
Summary

करवीर निवासिनी अंबाबाईची (Ambabai Temple) ओटी भरावी, देवदर्शन करावे म्हणून पत्नी मुलासोबत दुचाकीवरून शहराकडे येत होती.

कोल्हापूर : ममदापूर (निपाणी) येथील शेतकरी कुटुंबाच्या कर्त्या पुरुषाला शस्रक्रियेसाठी कोल्हापुरातील रुग्णालयात दाखल केले. चार दिवसांपासून उपचारानंतर शस्रक्रिया यशस्वी झाली. करवीर निवासिनी अंबाबाईची (Ambabai Temple) ओटी भरावी, देवदर्शन करावे म्हणून पत्नी मुलासोबत दुचाकीवरून शहराकडे येत होती. मात्र, आर. के. नगर चौकात एक भटका घोडा आडवा आल्याने त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. यात डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या शोभा सदानंद शिपुरे (वय ५३) यांचा अपघाती मृत्यू झाला.

पतीच्या स्वास्थ्यासाठीची त्यांची प्रार्थना अधुरीच राहिली. शिपुरे कुटुंबीय मूळचे निपाणीतील ममदापूर (Mamdapur Nipani) (जि. बेळगाव) येथील. शेतकरी कुटुंबातील सदानंद शिपुरे यांच्यावर एक शस्रक्रिया करण्यात येणार होती. यासाठी चार दिवसांपासून पती, पत्नी व मुलगा ओंकार कोल्हापुरात आले होते. ही शस्रक्रिया यशस्वी झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

Kolhapur Accident
पूर्ववैमनस्यातून पोलिस खबऱ्याचा निर्घृण खून; डोक्यात रॉड घातला अन् नंतर बीअरच्या बाटल्या फोडून पोटात खुपसल्या

शोभा शिपुरे यांनी मनापासून देवाचे आभार मानले व मुलगा ओंकारजवळ त्यांनी अंबाबाईची ओटी भरून येऊ अशी इच्छा व्यक्त केली. जाता जाता साने गुरुजी वसाहतीतील इस्कॉन मंदिरातही दर्शन करून पुढे जाऊ, असेही त्यांनी सांगितले. ओंकारनेही याला होकार दिला.

Kolhapur Accident
सख्खा भाऊ पक्का वैरी! 'त्या' चांदी उद्योजकाचा भावानेच केला खून; वडिलोपार्जित मालमत्तेचा वाद, मित्रालाही अटक

सोमवारी सायंकाळी ते दुचाकीवरून देवदर्शनासाठी बाहेर पडले. आर. के. नगर चौकात भटका घोडा त्यांच्या दुचाकीच्या आडवा आल्याने दुचाकी घसरली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने शोभा शिपुरे बेशुध्द झाल्या; तर ओंकार किरकोळ जखमी झाला. शोभा यांना बेशुध्दावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. शोभा यांच्या मागे पती, मुलगा, मुलगी, जावई असा परिवार आहे.

भटक्या जनावरांचा प्रश्न ऐरणीवर...

आर. के. नगर, राजेंद्रनगर, सुभाषनगर रस्त्यावर भटकी कुत्री, गायी, घोडे रस्त्याकडेला दिसून येतात. जनावरे दुचाकीच्या वाहनांच्या आडवे येण्याचे प्रकार घडत आहेत. अशा भटक्या जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी रहिवाशांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.