आमदार नितेश राणे पुढील उपचारासाठी कोल्हापुरात दाखल

पुढील उपचारासाठी राणे यांना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
kolhapur
kolhapuresakal
Updated on
Summary

पुढील उपचारासाठी राणे यांना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कोल्हापूर - संतोष परब (Santosh Parab) हल्लाप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना वैद्यकीय तपासणीसाठी आज कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात cpr दाखल करण्यात आले. दरम्यान तरल येथे त्यांना त्रास झाल्यामुळे तेथेच तरेळे गावानजिक रुग्णवाहिकेतच त्यांच्यावर उपचार केल्याची माहिती त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे. दरम्यान, पुन्हा ते वैद्यकीय पथकासह ते कोल्हापूरकडे रवाना झाले आहेत.

आमदार राणे यांना कोल्हापुरात आणण्यात येत असल्याने छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात cpr मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहर पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण, शहर वाहतूक शाखेच्या निरीक्षक स्नेहा गिरी, शाहुपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेश गवळी यांच्यासह पोलिस फाटा तैनात होता.

आमदार राणे यांना कोल्हापूर आणण्यात येत असल्याने कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे, पंचायत समिती सभापती मनोज रावराणे, जयंत रावराणे, संतोष कानडे, भाई सावंत,ओरस परिसरातील तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन तोडकर, क्षत्रिय मराठाचे दिलीप पाटील, दयानंद नागठिले यांच्यासह काही कार्यकर्ते सीपीआर परिसरात थांबून होते. मात्र पोलिसांनी कोल्हापुरातील तोडकर यांना रुग्णालय परिसरातून बाहेर जाण्यास सांगितले.

108 रुग्णवाहिकासह पोलिस बंदोबस्तात दुपारी साडेचारच्या सुमारास वैद्यकीय पथकाचा ताफा सीपीआरमध्ये दाखल झाला. सुरुवातीला आमदार राणे यांना अपघात विभागात घेऊन जाण्यात आले. तेथे दाखल करण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण केली नंतर पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.