कोल्हापूर : साखर कारखान्यांनी (Sugar factory)इथेनॉल तयार करताना ‘बी हेवी मोलॅसीस’(B. Heavy molasses)मध्ये २० टक्के साखर मिश्रण करावी. त्यापासून तयार होणाऱ्या इथेनॉलला (Ethanol)थेट उसाच्या रसापासून (Sugarcane juice) तयार होणाऱ्या इथेनॉलचा दर देण्यासाठी प्रयत्न करू, अशा प्रकारचा प्रस्ताव राज्यातील कारखान्यांनी केंद्राकडे पाठवावा, आपण त्याचा पाठपुरावा करू, अशी सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली.
Nitin Gadkari appeal to manufacture Sugar factory Proposal kolhapur update marathi news
केंद्राने याला मान्यता दिल्यास साखर साठा कमी करण्यासाठी हा एक चांगला पर्याय होऊ शकतो, असे मत साखर तज्ज्ञांचे आहे. गडकरींच्या मते साखर मिश्रणाचा प्रयोग झाल्यास देशातील ६० लाख टन व राज्यातील २५ लाख टन साखरेचा बोजा कमी होऊ शकेल.सध्या साखर कारखानदारी आर्थिक संकटातून जात आहे. देशात ३०० हून अधिक टन साखर उत्पादित झाली आहे. यात राज्याचा वाटा १०६ लाख टनाचा आहे. यापैकी कोल्हापूर सांगली जिल्ह्यात यंदा २७ पुणे जिल्ह्यात २५ लाख टन साखर उत्पादित झाली आहे.
मागणी नसल्याने ही साखर विकायची कोठे? हा प्रश्न आहे. यातून मार्ग काढण्यासाठी बी हेवी मोलॅसीसमध्ये साखर मिश्रण करावी, असा सल्ला श्री. गडकरी यांनी दिला आहे. असे मिश्रण करून इथेनॉल केल्यास व त्याला रसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा दर मिळाल्यास साखरेचा दर ३६ रुपये किलोपर्यंत मिळू शकतो, असा अंदाज श्री गडकरी यांनी व्यक्त केला आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याशी चर्चा करून या मागणीचा प्रस्ताव तातडीने पाठवा, अशा सूचना श्री. गडकरी यांनी राज्यातील साखर उद्योगाला केल्या आहेत.
शिल्लक साखर कमी करण्यासाठी हा पर्याय योग्य आहे. शासनाने याला परवानगी दिली तर ते नक्की फायदेशीर होईल. तांत्रिक बाबीत काय बदल करावे लागतील याबाबत अभ्यास करावा लागेल.
- विजय औताडे, साखरतज्ज्ञ
Nitin Gadkari appeal to manufacture Sugar factory Proposal kolhapur upd
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.