स्वामींच्या मागणीला बापटांच्या विहिनींचा पाठिंबा

स्वामींच्या मागणीला बापटांच्या विहिनींचा पाठिंबा
Updated on

सांगली: भाजपचे ज्येष्ठ नेते व राज्यसभेचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी(Subrahmanyam Swami) यांनी देशाची सध्याची कोरोना (Covid19)स्थिती हाताळण्यासाठी केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे नेतृत्व द्यावे या मागणीला भाजपच्या राज्य कार्यकारणी सदस्या व ज्येष्ठ महिला नेत्या नीता केळकर (Nita Kelker)यांनीही पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी समाजमाध्यमावर तशी अपेक्षा व्यक्त केल्यानंतर राज्यातील भाजप (BJP)वतुर्ळात त्याची चर्चा सुरु झाली आहे.

Nitin Gadkari given the leader Corona positive supported by Nita Kelkar also sangli political marathi news

श्रीमती त्यांनी पक्षाच्या वेबपेजलाही टॅग करताना सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, प्रवक्ते केशव उपाध्ये, अतुल भातखळकर यांच्यासह राज्यातील अनेक भाजप नेत्यांनाही टॅग केले आहे. याबाबत सौ.केळकर यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या,‘‘ देशावर मोठी आपत्ती आली आहे. अशा काळात गडकरी यांच्यासारख्या अनुभवी नेतृत्वाचा पक्षाने पुरेपूर उपयोग केला पाहिजे. सध्या ते नागपूरात अडकले आहेत. त्यांचे प्रशासकीय कौशल्य वादातीत आहे. ते ही परिस्थिती सक्षमपणे हाताळू शकतात. माझ्या या मागणीवर भाजपचे राज्यातील ९९ टक्के लोक सहमत आहेत. पक्षात असा विचारप्रवाह आहे. सध्याच्या कोरोनास्थितीमुळे पक्षाच्या बैठकींचे व्यासपीठ खुले नसल्याने मी समाजमाध्यमाचा आधार घेतला आहे.’’

सौ.केळकर या भाजपच्या निष्ठावान नेत्या आहेत. पक्षाची धुरा प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे यांच्याकडे असतानच्या काळात त्यांच्याकडे राज्य महिला आघाडीची धुरा होती. पक्षाच्या सुरवातीच्या पडत्या काळात त्यांनी सांगलीतून विधानसभेची निवडणूक लढवली होती. अगदी अलीकडची ओळख म्हणजे पुण्याचे माजी पालकमंत्री आणि विद्यमान खासदार गिरीष बापट त्यांचे व्याही आहेत. 

Nitin Gadkari given the leader Corona positive supported by Nita Kelkar also sangli political marathi news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.